आंबेडकरांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज — इक्रमभाई खान
पुणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणे आज गरजेचे असल्याचे मत पुना गोल्फ क्लब चे कप्तान इक्रमभाई खान यांनी व्यक्त केले .भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येरवडा येथे पुना गोल्फ क्लब कामगार संघटनेच्या वतीने स्नेहभोजन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते .या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत सामाजिक समता, बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
स्नेहभोजनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा डॉ. आंबेडकरांचा संदेश अंगीकारण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन पुना गोल्फ क्लब कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते .यावेळी पुना गोल्फ क्लब चे कप्तान इक्रम खान ,राष्ट्रवादी चे नेते सोमनाथ आप्पा शिंदे ,आंबेडकरी चळवळीचे नेते मिलिंद गायकवाड,रिझवान सय्यद,शफी खान ,पुना क्लब चे संचालक राजू परदेशी ,कामगार संघटनेचे युवराज थोरात ,अनिल काकडे,सिद्राम गोरे,रफिक खान ,तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी स्नेहभोजनाचा लाभ घेत कार्यक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमामुळे येरवडा परिसरात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
