अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक 20 मे रोजी संपूर्ण भारतभर केमिस्ट बंद ची हाक दिली व हा बंद यशस्वी सुद्धा झाला आहे.
यातील प्रमुख महत्त्वाचे काही मुद्दे म्हणजे अत्यंत चुकीच्या पद्धतीने ऑनलाइन औषध विक्री चालू आहे त्यामध्ये गर्भपाताची औषधे, नशेची औषधे कुठलाही नियम न पाळता सर्रास विक्री चालू आहे व हे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे तसेच ग्राहकांना जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून डुप्लिकेट औषधे सर्रास विकली जात आहे सर्वसामान्य जनतेला डुप्लिकेट औषधे सहज ओळखता येणे अशक्य आहे परंतु जास्तीच्या नफ्याच्या अमिषा पोटी ग्राहक यात फसले जातात हे अनेक वेळा पुराव्यासह सिद्ध झालेले आहे.
केमिस्ट बांधव हा नेहमी च ग्राहकांच्या म्हणजेच नागरिकांच्या हिताचे, आरोग्य सांभाळण्याचे कर्तव्य पार पाडत असतात त्यामुळे औषध विक्री ही प्रत्यक्ष केमिस्ट बांधवाकडूनच झाले पाहिजे तरच जनतेचे आरोग्य व्यवस्थित राहू शकते
पिंपरी चिंचवड शहरात जवळपास अडीच हजाराहून २५०० हून जास्त केमिस्ट बांधव या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभागी झाले होते त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात केमिस्ट बांधवांकडून 100% बंद पाळण्यात आला
मधुकर बहिरू बच्चे
मेडिकल मालक
चैतन्य फार्मा ग्रुप चिंचवड
७३८५५४६६८१
