!-- afp header code starts here --> कामगारांच्या मानवी साखळीतून एकजुटीचे प्रदर्शन

कामगारांच्या मानवी साखळीतून एकजुटीचे प्रदर्शन

 


पिंपरी चिंचवड - महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने थरमॅक्स चौक, पिंपरी चिंचवड येथे भव्य “कामगार मानवी साखळी” करण्यात आली. यावेळी कष्टकरी, कामगारांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आपल्या हक्कांसाठी मानवी साखळी करून आपल्या एकजुटीचे प्रदर्शन केले.

 क्रांतिकारक आणि महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि  संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत, त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेत आजच्या कामगार चळवळीला नवी दिशा देण्याचा देण्याची गरज असल्याचे मत नखाते यांनी व्यक्त केले.

कामगारांना म्हातारपणी पेन्शन द्या, अन्यायकारक ४ श्रमसंहिता रद्द करा, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा द्या आणि सर्व कामगारांना किमान समान वेतन द्या, या ठोस मागण्यासाठी मोठ्या संख्येने कामगार सहभागी होत जोरदारपणे मांडण्यात आल्या. आणि मोठ्या घोषणा देत परिसर दणाणून गेला. 

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ कष्टकरी रिक्षा टॅक्सी संघर्ष महासंघातर्फे आयोजित कामगार मानवी साखळी मध्ये कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, मनपा समिती सदस्य सलीम डांगे,आयोजक सिद्धनाथ देशमुख,महिलाअध्यक्षा माधुरी जलमूलवार, सुनील भोसले, दादा काळोखे,शमशुद्दीन शेख, लाला राठोड, संभाजी वाघमारे, कान्हाभाऊ व्हरकटे,सचिन मुरगुंड, सुनिता दिलपाक, लक्ष्मी गायकवाड, शकुंतला ठोंबरे , सुनीता साळवी आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने