पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विकास लवांडे यांच्यावरती संग्राम बापू भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाही फेक व जीवे मारण्याचा हल्ल्या केला त्यांचा आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संत परंपरेचा आणि भक्तीचा पवित्र वारसा आहे. लाखो वारकरी विठ्ठल नामाचा जप करत समाजाला प्रेम, समता आणि मानवतेचा संदेश देतात.
मात्र काही विकृत आणि ढोंगी प्रवृत्तीचे लोक वारकरी संप्रदायात घुसून महिलांवर अन्याय, गैरवर्तन, आर्थिक फसवणूक व समाजविघातक कृत्य करून संपूर्ण वारकरी परंपरेला बदनाम करण्याचे काम करत आहेत. अशा प्रवृत्तींच्या लोकांना भारतीय जनता पार्टीचे सरकार पाठिंबा देत आहे अशा सरकारचाही आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.
खरा वारpकरी हा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवयांच्या विचारांवर चालणारा असतो.
महिलांचा सन्मान, समाजातील शिस्त आणि सदाचार हीच खरी वारकरी परंपरा आहे.
अशा वाईट प्रवृत्तीवर कठोर कारवाई व्हावी आणि वारकरी संप्रदायाची पवित्रता कायम राखली जावी, हीच अपेक्षा आहे.
वारकरी संप्रदायात वाईट प्रवृत्तीचा,गुन्हेगारीचा जाहीर निषेध.
“टिळा माळ गळ्यात, अंतरी काळोख भारी
मुखी नाम विठ्ठलाचे, कर्मे गुन्हेगारी
टिळा कपाळी मोठा, अंतरी विषाचा डोंगर
अशांनीच बदनाम केला, वारकऱ्यांचा सागर।।
दिंडीत नाचे भक्ती, पण नजरा, कृत्य वाईट भारी
अशा ढोंगी भक्तांना, विठ्ठल कधी ना तारी।।
आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर निषेध
