आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांतदादा कुराडे यांच्या मध्यस्थीमुळे संघर्ष टाळला; डॉ. बाबा कांबळे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आंदोलन मागे!


संत रोहिदास मंदिराचे निवारा शेडचे काम थांबवल्यामुळे कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे झाले होते आक्रमक.

वारकऱ्यांना सुख सुविधा, देण्यापासून रोखणाऱ्यांना, कायदेशीर धडा शिकवणे आवश्यक डॉ बाबा कांबळे

नगराध्यक्षांच्या यशस्वी शिष्टाईनंतर कायदेशीर परवानगी घेऊन तात्काळ काम सुरू करण्याचे प्रशासनाचे आदेश.

श्रीक्षेत्र आळंदी देवाची :श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर असलेल्या "'समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संस्थान' (संत गोविंद बाबा समाधी मंदिर व संत रोहिदास महाराज पादुका मंदिर) येथील भाविकांच्या निवारा शेडचेडागडुजीचे काम आळंदी नगरपरिषदेने थांबवल्यामुळे निर्माण झालेला तणाव अखेर आज निवळला. कष्टकऱ्यांचे नेते आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांतदादा कुराडे व भाजप गटनेते सचिनदादा गिलबिले यांनी तातडीने मध्यस्थी केली. योग्य ती कायदेशीर परवानगी घेऊन डागडुजीचे काम तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर, डॉ. बाबा कांबळे यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे आळंदीतील संभाव्य मोठा संघर्ष टळला आहे.

नेमके प्रकरण काय?

"'समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा' या ठिकाणी सुमारे १०० वर्षांपूर्वीचे जुने पत्रे असून ते पूर्णपणे कुजले व जीर्ण झाले आहेत. आगामी पावसाळा आणि ८ जुलै २०२६ रोजी होणारे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान लक्षात घेता, येथे नवीन पत्रा शेड दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात रथाच्या पुढे आणि घोड्याच्या पाठीमागे चालणारी संत रोहिदास महाराज दिंडी क्रमांक २४ (विमानाची दिंडी) ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तसेच ८ जुलैपूर्वी येथे अखंड हरिनाम सप्ताह असतो, ज्यासाठी राज्यभरातून अनेक वारकरी, भाविक भक्त आणि अनुसूचित जाती-जमातीचे नागरिक मोठ्या संख्येने मुक्कामास येतात. या भाविकांचे पावसापासून संरक्षण व्हावे आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून हे काम सुरू होते. परंतु, काही समाजकंटक आणि समाजात दुही माजवू पाहणाऱ्या प्रवृत्तींनी जाणीवपूर्वक नगरपरिषदेत तक्रार करून प्रशासनावर दबाव आणला व हे काम थांबवायला लावले होते.

डॉ. बाबा कांबळे यांचा आक्रमक पवित्रा आणि शिष्टमंडळाची भेट

या अन्यायकारक कारवाईविरोधात आणि समाजकंटकांच्या भूमिकेविरोधात आज, बुधवार दिनांक २० मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता, परंतु आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत दादा कुऱ्हाडे यांनी, या संदर्भात, बैठक आयोजित करून, आषाढी वारीच्या निमित्ताने येणाऱ्या वारीत वारकरी भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारे पाऊस पाण्यापासून त्रास होणार नाही, यासाठी योग्य ती दखल प्रशासन केलेला असा आश्वासन दिले, यामुळे, आंदोलन व संघर्ष ठरला, आणि मोर्चा रद्द करून, संस्थेचे शिष्टमंडळाने आळंदी नगरपरिषदेत धाव घेतली. आणि नगराध्यक्ष व प्रशासन सोबत चर्चा केली, 

" शिष्टमंडळात चर्मकार विकास संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय खामकर, गुरु रोहिदास चर्मकार महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, यांचा प्रामुख्याने समावेश होता. 

या वेळी डॉ. बाबा कांबळे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, "भाविकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या समाजकंटकांचा डाव खपवून घेतला जाणार नाही आणि काम तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा दिला.

नगराध्यक्षांची मध्यस्थी आणि तोडगा

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांतदादा कुराडे व भाजप गटनेते सचिनदादा गिलबिले यांनी तातडीने मध्यस्थी केली. त्यांनी आंदोलक आणि प्रशासन यांच्यात सुवर्णमध्य साधत, हे काम जुन्या इमारतीची डागडुजी व भाविकांच्या सोयीचे असल्याने, रीतसर परवानगी घेऊन हे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. नगराध्यक्षांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आणि मध्यस्थीमुळे अखेर संघर्ष टाळला व डॉ. बाबा कांबळे यांनी आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

यांची लाभली प्रमुख उपस्थिती

या प्रसंगी संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण, विश्वस्त तुषार नेटके, मधुराताई डांगे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य सौ. आशा बाबासाहेब कांबळे, ह.भ.प. संदीपान महाराज घायाळ, मंदिराचे पुजारी व व्यवस्थापक नारायण गाडेकर, टपरी पथारी हातगाडी पंचायत आळंदी शहर अध्यक्ष राहुल कुराडे, आळंदी नगरपरिषद फेरीवाला समिती सदस्य महेश जाधव, मंचक यादव, सौ. सुनिताताई ठुबे, सचिन आडवळे, मोहन भालेराव, अशोक पांढरे, तसेच कष्टकरी कामगार पंचायत खेड तालुका अध्यक्ष सुलतान शेख आदी कष्टकरी पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने