!-- afp header code starts here --> प्रेरणादायी भेट..“उच्च पदस्थ साधी माणसं”

प्रेरणादायी भेट..“उच्च पदस्थ साधी माणसं”

 


आळंदी (अर्जुन मेदनकर) : ससून जनरल हॉस्पिटल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव यांना भेटण्याचा योग आला. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन भारती त्यांच्या सोबत उपस्थित होते.

मोठ्या पदावर, अधिकाराच्या स्थानावर आणि प्रतिष्ठित भूमिकेत असूनही स्वभावाने अत्यंत नम्र, साधेपणाने वागणारी व सर्वसामान्य लोकांशी आपुलकीने संवाद साधणारी व्यक्ती म्हणजेच जाधव साहेब, याची प्रचिती आजच्या भेटीत प्रकर्षाने आली.

आपल्या अत्यंत व्यस्त दैनंदिन कामकाजातून वेळ काढून त्यांनी धानोरे शाळेचा उल्लेख होताच शाळेविषयी सविस्तर चर्चा केली. शाळेत दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हेही त्यांनी अत्यंत समर्पकपणे पटवून दिले.

ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तेसह अद्ययावत भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे गजानन पाटील  यांचे सातत्याने सुरू असलेले प्रयत्न या विषयीची माहितीही त्यांनी आवर्जून जाणून घेतली.

भेटी दरम्यान लवकरच धानोरे शाळेला भेट देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या साधेपणाने, सकारात्मक विचारांनी आणि शिक्षणाविषयीच्या तळमळीने ही भेट निश्चितच प्रेरणादायी ठरली असल्याचे आदर्श शाळा धानोरेचे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने