पिंपरी चिंचवड : वुई टुगेदर फाउंडेशन नेहमी गोरगरीब, सर्वसामान्य ,वंचित, निराधार, अंध, अपंग, गरीब विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच दुर्गम भागातील ग्रामीण भाग अशा सर्व लोकांसाठी काम करत असते.
कायमच काही ना काही समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात
पिंपरी येथील सावली निवारा वृद्धाश्रम हा शहरातील विविध भागातून निराधार वृद्धांना या आश्रमात घेऊन येतात व त्यांचं पूर्ण संगोपन केलं जातं हे संगोपन निशुल्क असतं त्यामुळे या सावली निवारा आश्रमास कायम मदतीची गरज असते म्हणूनच वुई टुगेदर फाउंडेशन च्या वतीने या सावली निवारा आश्रमात कायम काही ना काही रुपात मदत केली जाते त्याचाच एक भाग म्हणून या आश्रमातील वृद्ध महिला, पुरुषांना कपडे, प्रथमोपचार पेटी व अत्यावश्यक औषधे तसेच खाऊ वाटप चा कार्यक्रम करण्यात आला
वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले
या आश्रमातील वृद्ध महिला पुरुष हे आमच्यासाठी कायमच दातृत्व म्हणजेच आशीर्वाद रुपी असणार त्यामुळे त्यांची सेवा आमच्या हातून कायम घडत राहो व या वृद्धांच्या सेवेसाठी कायमच आम्ही तत्पर राहू असे बच्चे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्ष रवींद्र काळे ,सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे - सपकाळे ,खजिनदार दिलीप चक्रे सल्लागार कुशाल दुसाने माजी अध्यक्ष सलीम सय्यद ,विलास गटने, रंगाराव कुकाला, रोहिणी बच्चे, सुषमा कोरे,आदींनी या कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला
