जुन्नर : जुन्नर तालुक्यातील बारव येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद मोहम्मद साहिल कासिम हुसेन (वय ३८, रा. बारव, ता. जुन्नर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मालकीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची दुचाकी त्यांच्या राहत्या घरासमोर उभी करण्यात आली होती.
दि. २४ मे २०२६ रोजी रात्री ११.३० वाजेपासून ते २५ मे २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय दुचाकी चोरी करून नेल्याचे समोर आले आहे. चोरीस गेलेल्या मोटारसायकलीची अंदाजे किंमत २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार हिले करीत असून पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
.png)