जुन्नर तालुक्यातील खटकाळे येथे गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

Man arrested for cultivating marijuana in Khatkale, Junnar taluka


जुन्नर (रफिक शेख) : जुन्नर तालुक्यातील खटकाळे येथे गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी कारवाई करत एका शेतकऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमा सखाराम केदारी (वय ६२, रा. खटकाळे, ता. जुन्नर) यांनी त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक १५१ मधील शेतजमिनीत गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले.

दि. ६ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून १.३७८ किलो वजनाची गांजाची १८ ओली हिरवी झाडे जप्त केली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १३ हजार ७८० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी जुन्नर पोलीस स्टेशन येथे NDPS Act 1985 कलम 20(B)(IIA), 8(B), 8(C) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने