आरक्षणाचे 'अ-ब-क-ड' वर्गीकरण आणि लोकसंख्येच्या घसरणीविरोधात चर्मकार समाज आक्रमक;

 


उद्या आळंदीत राज्यव्यापी महाबैठक डॉ बाबा कांबळे यांची माहिती,

आळंदी : भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना दिलेला आरक्षणाचा अधिकार हा सामाजिक आणि शैक्षणिक अन्यायाची भरपाई आहे. मात्र, सध्या आरक्षणाचे उपवर्गीकरण (Categorization) करून समाजाची एकसंधता मोडीत काढण्याचे षडयंत्र रचले जात आहे. तसेच, बार्टी (BARTI) संस्थेच्या अहवालात चर्मकार समाजाच्या लोकसंख्येची टक्केवारी चुकीच्या पद्धतीने दर्शवून समाजावर मोठा अन्याय करण्यात आला आहे. या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि समाजाच्या न्याय्य हक्कांच्या लढाईची दिशा ठरवण्यासाठी उद्या, गुरुवार, २८ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे 'राज्यव्यापी महाबैठक' आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी देवाची अध्यक्ष डॉ बाबा कांबळे यांनी दिली आहे,

​प्रमुख आक्षेप आणि मागण्या:

१. लोकसंख्येचा आकडा: १९६१ मध्ये चर्मकार समाजाची लोकसंख्या २३.७४% होती, ती २०११ मध्ये १०.९७% वर कशी आली? बार्टीने दिलेला अहवाल तथ्यहीन असून, तो आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे.

२. आरक्षण वर्गीकरण: 'अ-ब-क-ड' आरक्षणाच्या नावाखाली चर्मकार समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला जात आहे, याला समाजाचा तीव्र विरोध आहे.

३. शासकीय प्रतिनिधीत्व: शासकीय नोकऱ्या आणि प्रशासकीय सेवांमध्ये समाजाचे प्रतिनिधित्व नगण्य आहे, तसेच 'LIDCOM' महामंडळाचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाहीत.

4. बैठकीचे स्वरूप:

या ऐतिहासिक बैठकीला महाराष्ट्रातील विविध चर्मकार संघटनांचे पदाधिकारी, नेते, विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी, साहित्यिक, उद्योजक, वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि राज्यभरातील हजारो समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. 

यात माजी समाज एक न्याय मंत्री बबनरावजी घोलप, चर्मकार संघाचे अध्यक्ष संजय खामकर,, संत रोहिदास महामंडळाचे माजी अध्यक्ष, ज्ञानेश्वर कांबळे, आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत,

समाजाच्या प्रगतीचा आणि हक्कांच्या रक्षणाचा एक निर्णायक आराखडा या बैठकीत तयार केला जाणार आहे.

​आयोजकांचे आवाहन:

"ही केवळ एक बैठक नसून, चर्मकार समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे. या बैठकीत संविधानिक चौकटीत राहून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. आपल्या सर्वांची उपस्थिती हीच समाजाची खरी ताकद आहे," असे आवाहन समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी देवाची यांच्या वतीने करण्यात आले आहे.

​बैठकीची वेळ व ठिकाण:

​दिनांक: गुरुवार, २८ मे २०२६

​वेळ: सकाळी ११:०० वाजता

​स्थळ: समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा, श्रीक्षेत्र आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे.

​या बैठकीसाठी राज्यभरातून येणाऱ्या समाजबांधवांसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी डॉ बाबा कांबळे,9850732424,

थोडे नवीन जरा जुने