!-- afp header code starts here --> स्वच्छता सर्वेक्षण एक धूळफेक

स्वच्छता सर्वेक्षण एक धूळफेक

 


आपले शहर सुंदर स्वच्छ हरित दिसावे यासाठी अनेक स्वच्छता दूत समाजसेवक संस्था कार्य करीत असताना, प्रशासन मात्र अतिशय चफलक पणे नागरिकांच्या डोळ्यात धुळ टाकण्याचे काम करते. शहर स्वच्छता सर्वेक्षणात शहर कसे असावे उद्यान कसे असावे ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण प्रत्यक्षात आपले शहर आपले उद्यान खरंच तशी असते का...? तर याचे उत्तर "नाही"असे आहे. नुकतेच २०२५ २०२६ या वर्षासाठी स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये किमान २१ दिवस उद्यानामध्ये सुंदर अशा या कुंड्या ठेवलेल्या होत्या. उद्यान स्वच्छ सुंदर दिसत होते. पण लोकांना काय माहित किती दिवस राहणार आहे. 

आम्हाला हे माहीत होते की सर्वेक्षण झाल्याबरोबर या कुंड्या उचलल्या जातील आणि दोन दिवसांपूर्वी सर्वेक्षण झाले झाल्या दहा मिनिटाच्या कालावधीत सर्व कुंड्या उचलून नेण्यात आल्या. सर्वेक्षणाच्या वेळेला शौचालय अतिशय स्वच्छ करण्यात येते. दैनंदिन स्वच्छता मात्र तशी राहत नाही ही नागरिकांची दिशाभूल आहे आणि ही दिशा फुल करणे हा नागरिकांचा फार मोठा अपमान आहे. 

आव्हान नागरिकांना करायचे अधिकाऱ्यांनी आपली इन्क्रिमेंट घ्यायचे आपली कॉलर टाईट करायची नागरिकांकडुन ऑनलाइन डिजिटल फॉर्म भरून घ्यायचे आणि त्या आधारा नुसार शहराचे नामांकन मिळवाचे.

वारे वा ही प्रशाशनाची हुशारी.

यशवंत कण्हेरे

अध्यक्ष कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच महात्मा फुले नगर चिंचवड पुणे १९

थोडे नवीन जरा जुने