MGID Header Code
Code End

यमुनानगर मध्ये लाखो लिटर पाणी वाया

 


पिंपरी चिंचवड : यमुनानगरमध्ये पाणीपुरवठा व वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

यमुनानगर परिसरात पाणीपुरवठा व वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांपासून अनेक भागांतील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत.


या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबा परब यांनी आंदोलन छेडले आहे. संबंधित विभागांनी तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा व पाण्याची होणारी नासाडी थांबवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

थोडे नवीन जरा जुने