!-- afp header code starts here --> पूरग्रस्त भागात तातडीने स्वच्छता मोहीम राबवा - नाना काटे

पूरग्रस्त भागात तातडीने स्वच्छता मोहीम राबवा - नाना काटे

अलीकडील मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल, कचरा व साचलेले पाणी राहिले असून त्या परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.

पूर ओसरल्यानंतर नागरिकांनी घरातील खराब झालेले साहित्य, कचरा व इतर टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणात बाहेर काढल्या आहेत. मात्र कचरा वाहून नेण्यासाठी कचरा गाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खालील उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, ही नम्र विनंती आहे.

१. पूरग्रस्त भागांमध्ये अतिरिक्त कचरा गाड्यांची व्यवस्था करून त्वरित कचरा उचलण्यात यावा.

२. सर्व परिसरात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी.

३. आवश्यक त्या ठिकाणी ब्लीचिंग पावडर व इतर जंतुनाशक पावडरची फवारणी करण्यात यावी.

४. रस्ते, सोसायट्या व सार्वजनिक ठिकाणांची जेट स्प्रे मशीनद्वारे स्वच्छ धुलाई करण्यात यावी.

५. डास प्रतिबंधक फॉगिंग व आवश्यक आरोग्यविषयक उपाययोजना राबविण्यात याव्यात.

६. आरोग्य विभागामार्फत आवश्यक वैद्यकीय पथके तैनात करून नागरिकांना तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

पूरग्रस्त नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून महानगरपालिकेने वरील सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवून नागरिकांना दिलासा द्यावा. माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे कळवले आहे.

थोडे नवीन जरा जुने