!-- afp header code starts here --> दुर्गम भागातील गरजू मुलांच्या शिक्षणाला हातभार

दुर्गम भागातील गरजू मुलांच्या शिक्षणाला हातभार

  


प्रिय मित्रांनो,

आपल्या ओळखीत खेड तालुका किंवा जुन्नर तालुका येथील दुर्गम भागात राहणारे, शाळेत नियमित शिक्षण घेणारे आणि सायकलची खरी गरज असलेले आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थी असतील, तर कृपया त्यांची माहिती आम्हाला कळवा.

या उपक्रमासाठी संबंधित विद्यार्थ्यांकडून संपूर्ण माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून घेण्यात येईल. सर्व अर्जांची पडताळणी करून खरोखर गरजू विद्यार्थ्यांनाच सायकली देण्यात येतील.

हा सामाजिक उपक्रम

डॉ. किशोर थोरात

संस्थापक अध्यक्ष

श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था

तसेच

महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ

यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

 महत्त्वाची सूचना :

हा उपक्रम फक्त पुणे जिल्हा क्षेत्रातील खेड व जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठीच आहे.

📞 संपर्क : 8796824682

 आपल्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रवास सोपा होऊ शकतो.

कृपया हा संदेश जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचवा. 

थोडे नवीन जरा जुने