पिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक १८ केशवनगर चिंचवड मध्ये आठवडे बाजार मैदानात गेल्यावर्षी गणेश विसर्जन हौद तयार करण्यात आला होता तो अत्यंत चुकीचा व जनतेचा पैशाची उधळपट्टी करणारा निर्णय होता.
त्या ठिकाणी हौदाची काहीच आवश्यकता नव्हती तसेच कुठल्याही नागरिकांची, गणेश भक्तांची मागणी ही नव्हती त्यामुळे त्या ठिकाणी नाहक जनतेच्या पैशाची उधळपट्टी झाली हा हाऊस का बनवला होता असा अजूनही जनतेच्या मनात प्रश्न पडलेला आहे.
यावर्षी सुद्धा त्या ठिकाणी गणेश विसर्जन हौद बनवण्याची तयारी चालू आहे असे समजते!तरी प्रशासनाने प्रभागातील नागरिकांचा विचार करून या ठिकाणी अजिबात हौद करू नये म्हणून भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांनी सिंहगड 'ब' प्रभाग क्षेत्रीय अधिकारी
तसेच व प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे यांना भेटून प्रभागातील परिस्थितीची सविस्तर माहिती देऊन चर्चा करून तसे निवेदन दिले आहे.
त्या ठिकाणी गणेश विसर्जन हौद बनवून काहीही उपयोग होत नाही केशवनगर मध्ये विवेक वसाहत या ठिकाणी अतिशय सुंदर गणेश विसर्जन घाट आहे. या ठिकाणी एक हौद कायमस्वरूपी तयार आहे तर गणेश विसर्जन वेळी आणखी एक हौद ठेवला जातो त्यातच आणखी एक वाढवावा म्हणजे दोन हौद करावे या ठिकाणी अत्यंत उत्तम पद्धतीने गणेश विसर्जन केले जाते त्यामुळे प्रशासनाने याची योग्य दखल घ्यावी व कुठल्याही परिस्थितीमध्ये आठवडे बाजार मैदानामध्ये गणेश विसर्जन हौद बनवू नये
बनवण्याचा प्रयत्न झाला तर प्रभागातील नागरिक स्वतःहून त्या ठिकाणी येऊन विरोध करणार एवढं मात्र निश्चित आहे.
मधुकर बच्चे
महामंत्री:भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा
7385546681
