MGID Header Code
Code End

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मृतींना रक्तदानातून अभिवादन

 


 थेरगावात रक्तदान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या स्मरणार्थ मराठवाड्याच्या मुक्तीसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या त्याग आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गोरख पाटील निलंगेकर व रविकिरण घटकार यांच्या वतीने थेरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

        या रक्तदान शिबिराला पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठवाडा वासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार व नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन उपस्थित होते. यावेळी ग्लोबल मराठा एक्सपोचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अर्जुन खामकर, व्यावसायिक दिलीप कुलकर्णी, पवार साहेब, जय हनुमान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय गायके, छावा युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, शिवसेना नेते हरेश नखाते, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, शिवसेना महिला आघाडी संघटिका अनिताताई पांचाळ, पिंपरी-चिंचवड शिवसेना उपशहर प्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, समन्वयक श्रीमंत गिरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निखिल साकळे, छावा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादाभाऊ पाटील, छावा मराठा महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा अश्विनीताई पाटील, युवा नेते हनुमं पिसाळ, उद्योजक नवनाथ जाधव, अक्षय घटकार, चंद्रकांत उंबरे, कामगार नेते परमेश्वर कुंभार, प्रा. शैलेश झरकर, आशिष पाटील, महाराष्ट्र आयटी सेनेचे अनिल ओझा, प्रकाश महल्ले उपस्थित होते. 

        यावेळी मराठवाड्याच्या संघर्षाची, कर्तृत्वाची आणि यशाची गाथा सांगत पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या मराठवाड्यातील युवकांनी एकत्र येऊन सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक गोरख पाटील निलंगेकर, रविकिरण घटकार यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तसंकलनासाठी पिंपरी-चिंचवड ब्लड बँकेचे सहकार्य मिळाले.

थोडे नवीन जरा जुने