MGID Header Code
Code End

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदेशीर बाईक टॅक्सी तात्काळ बंद करा, अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन - आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा


पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना सुरू असलेल्या रॅपीडो, उबेर, ओला या बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे अॅप्स बंद करण्याची मागणी आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेच्या वतीने आज मा. जिल्हाधिकारी, पुणे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (RTO) यांनी दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वृत्तनिवेदनात 'रॅपीडो' कंपनीकडे वैध बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर परवाना नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोणताही वैध परवाना नसताना सर्रास बाईक टॅक्सी चालवली जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे.

या अनधिकृत वाहतुकीमुळे कायद्याचे पालन करून, परवाना घेऊन प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या लाखो रिक्षा व टॅक्सी चालकांच्या उपजीविकेवर गदा येत आहे. तसेच विनापरवाना व व्यावसायिक विमा नसलेल्या या वाहनांमुळे प्रवाशांच्या जिवाचा व सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

यावेळी बोलताना आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड रिक्षा संघटना अध्यक्ष श्री.अंगद मुगळे यांनी सांगितले की, बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांवर केवळ नावाला नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईम विभागातर्फे व पोलिसांत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यांची वाहने जप्त करावीत आणि या कंपन्यांचे अॅप्स तातडीने बंद करण्यासाठी कारवाई करावी.

पुढील आठ दिवसांच्या आत ठोस कारवाई केली नाही, तर पुणे व पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालय (RTO) आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा हा आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री.वैजनाथ शिरसाट यांनी दिला आहे. आम आदमी पार्टी रिक्षा संघटना या भूमिकेशी सहमत असून या मागणीला पूर्ण पाठिंबा देत आहे.

श्री. अंगद रमेश मुगळे

आम आदमी पार्टी रिक्षा संघटना, पिंपरी-चिंचवड

श्री. वैजनाथ शिरसाट

शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड


थोडे नवीन जरा जुने