पिंपरी चिंचवड : पुणे व मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने तसेच नागपूर पदवीधर निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशाचा आनंदोत्सव पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पेढे वाटून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव,तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील विजयी झाले आहेत.या विजयाने शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात नवीन उत्साह संचारला अश्सल्याचे दिसले.
यावेळी बोलताना युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले ”हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून, लोकशाहीवरील विश्वासाचा आणि सुशिक्षित मतदारांच्या भ्रष्टसरकार विरुद्ध असलेल्या जनमताचा विजय आहे! या निकालाने महाविकास आघाडीच्या एकजुटीची ताकद कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे सामर्थ्य व जनतेच्या आणि मतदारांचा विश्वासाचे महत्त्व पुन्हा एकदा दिसून आले.
यावेळी शहराध्यक्ष तुषार भाऊ कामठे, पक्षाच्या नेत्या सुलक्षणा शिलवंत-धर, युवक अध्यक्ष इम्रान शेख,महिलाअध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, प्रदेश पदाधिकारी संदीपजी चव्हाण, वसीम पठाण,योगेश सोनवणे, प्रशांत काळेल, कमरूनिससा शेख, रेखा मोरे, कल्पना ताई घाडगे, सचिव परमेश्वर गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे,सुशांत गायकवाड, अश्रफ शेख,सुनील राठोड,यांच्या सह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
