MGID Header Code
Code End

स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारुती जाधव यांचा विशेष समाजसेवा उपक्रम; प्रभाग क्रमांक ११ मधील हजारो घरांमध्ये पणती वाटपाचा संकल्प!


पिंपरी-चिंचवड : दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक ११ मध्ये विशेष समाजसेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवाळीच्या पवित्र सणाचे औचित्य साधून कृष्णानगर, महात्मा फुलेनगर, शरदनगर, घरकुल तसेच परिसरातील हजारो कुटुंबांपर्यंत पणती पोहोचविण्याचा संकल्प मारुती जाधव यांनी केला आहे.

'एक पणती प्रेमाची… एक ज्योत आठवणींची… एक नाव अजितदादांचे!' या भावनिक संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. त्यांच्या कार्याची आणि आठवणींची ज्योत प्रत्येकाच्या मनात कायम तेवत राहावी, तसेच दिवाळीच्या आनंदात समाजातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग असावा, या भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यावेळी बोलताना मारुती जाधव यांनी सांगितले की, "अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेली प्रेरणा, सर्वसामान्य माणसांप्रती असलेली आपुलकी आणि त्यांच्या आठवणी आमच्या हृदयात कायम आहेत. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हजारो घरांमध्ये पणती पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक घरात पणतीचा प्रकाश उजळताना अजितदादांच्या आठवणींची ज्योतही तेवती राहावी, हीच आमची भावना आहे."

या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ पणतीचे वाटप नव्हे, तर प्रेम, आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

"दादा… तुमची आठवण प्रत्येक घरात, तुमच्या माणुसकीची ज्योत प्रत्येक मनात!" या भावनेतून प्रभाग क्रमांक ११ मध्ये हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

आयोजक :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

मारुती गणपत जाधव

सौ. कीर्ती मारुती जाधव

कीर्ती ताई मारुती जाधव युथ फाऊंडेशन

कार्य क्षेत्र : कृष्णानगर, महात्मा फुलेनगर, शरदनगर, घरकुल व प्रभाग क्रमांक ११ परिसर.

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

थोडे नवीन जरा जुने