पिंपरी चिंचवड : सध्या निगडीकडून आकुर्डीकडे जाणाऱ्या जुना मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील पुलाशेजारील रस्त्यावर तसेच भक्ती-शक्ती ते निगडी दरम्यान श्रीकृष्ण मंदिराजवळ मेट्रोच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
यासदर्भात अनेक वेळा मेट्रो प्रशासनाशी संपर्क साधून लेखी निवेदने देण्यात आली, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. विशेषतः श्रीकृष्ण मंदिर समोरील रस्ता मागील वर्षभरापासून बंद आहे व तो मार्ग देखील पूर्णपणे दुर्लक्षित आहे.
वरील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी व तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी दिनांक १० जुलै २०२५ (गुरुवार) रोजी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निगडी सिग्नल येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. कृपया याची नोंद घ्यावी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष, सचिन चिखले, राजू सावळे – उपाध्यक्ष, मनसे, जय सकट – शाखा अध्यक्ष, मनसे, रोहित काळभोर – शाखा अध्यक्ष, मनसे, आकाश कांबळे – मनसे सैनिक यांनी यासंबधी पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निगडी पोलीस स्टेशन, निगडी यांना दिले आहे.