PCMC :आषाढी एकादशी निमित्त विविध अध्यात्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडले

 


पिंपरी चिंचवड : पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या पावन दिवशी श्री व्यंकटेश्वरा ट्रस्ट, बालाजी मंदिर, मोहननगर यांच्या वतीने विविध अध्यात्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन अध्यक्ष सतिश सीलम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अभिषेक आणि नामस्मरणाने झाली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजन, श्री बालाजी अभिषेक तसेच वेदघोषासह श्री विष्णू सहस्रनाम पठण पार पडले.

या दिवशीचे विशेष आकर्षण ठरले ‘सुवर्ण संगीत भजनी मंडळ’ यांचे सुमधुर भजन व दृष्टीहीन मुलांनी सादर केलेला हृदयस्पर्शी भजन कार्यक्रम. या कार्यक्रमांनी उपस्थित भाविकांच्या मनाला अत्यंत भावनिक स्पर्श दिला.

कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्ष सतिश सीलम यांनी स्वतः उपस्थित राहून भक्तांना मार्गदर्शन केले व सर्व स्वयंसेवक, कलाकार व भाविकांचे मनःपूर्वक आभार मानले.

श्री व्यंकटेश्वरा ट्रस्टच्या वतीने या पवित्र कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.


– श्री व्यंकटेश्वरा ट्रस्ट, बालाजी मंदिर, मोहननगर


थोडे नवीन जरा जुने