जनतेचे मुलभूत प्रश्न सोडून संसदेत थेट समोस्याचा आकार आणि किंमतीतील असमानतेवर प्रश्न

MP-Ravi-Kisan-discusses-size-of-samosa-in-Parliament

Ravi Kishan Samosa Discussion : भारतीय संसदेत गंभीर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र, 2025 च्या मानसून सत्रादरम्यान, भाजपा खासदार आणि प्रसिद्ध अभिनेता रवी किशन यांनी एका अनपेक्षित विषयावर चर्चा घडवून आणली. त्यांनी समोस्याच्या आकार आणि किंमतीतील असमानतेवर प्रश्न उपस्थित करत सरकारला एकसमान धोरण बनवण्याची मागणी केली. या मुद्द्याने संसदेपासून सोशल मीडियापर्यंत चर्चेचा विषय बनला आहे.

रवी किशन यांचा संसदेतील मुद्दा

31 जुलै 2025 रोजी संसदेच्या मानसून सत्रात रवी किशन यांनी देशभरातील खाद्यपदार्थांच्या किंमती आणि गुणवत्तेत असलेल्या असमानतेवर भाष्य केले. त्यांनी समोस्याचा दाखला देत म्हटले, "देशभरात समोस्याचा आकार आणि किंमत वेगवेगळी का आहे? एका दुकानात छोटा समोसा, तर दुसऱ्या दुकानात मोठा समोसा का मिळतो? यावर सरकारने ठोस धोरण तयार करावे." त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, असून हा देशभरात चर्चेचा विषय बनला आहे.

रवी किशन यांनी हा मुद्दा उपस्थित करताना खाद्यपदार्थांच्या किंमती आणि गुणवत्तेत एकसमानता आणण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या मते, ग्राहकांना देशभरात समान दर्जा आणि किंमत मिळायला हवी. रवी किशन यांनी संसदेत समोस्याच्या किंमती आणि आकारावर चर्चा करून सगळ्यांचं लक्ष वेधलं, पण संसदेत चर्चा करण्या इतका हा विषय महत्वाचा आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

देशात पेट्रोल-डिझेलपासून दैनंदिन गरजेच्या वस्तूंपर्यंत सगळ्याच किंमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबलं आहे, घरखर्च भागवणं कठीण झालं आहे अशा परिस्थितीत सामान्य जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर कधी चर्चा होणार असा प्रश्न सामान्य जनता उपस्थित करत आहेत.

MP-Ravi-Kisan-discusses-size-of-samosa-in-Parliament

थोडे नवीन जरा जुने