PCMC : धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या कंत्राटी मजुरांसाठी सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळेच बीएसएनएल वर त्यांच्या मृत्यूची जबाबदारी - कामगार नेते जीवन येळवंडे


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - स्वातंत्र्यदिनाचे दिवशी भूमिगत चेंबर मध्ये गुदमरून तीन कंत्राटी कामगार मृत्यू पावले, या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे, शिवाय सरकारी बीएसएनएल सारखी सरकारी कंपनी कामगार सुरक्षेकडे किती अक्षम्य दुर्लक्ष करत आहे, हे स्पष्ट झाले आहे, मुळात स्वातंत्र्यदिनी त्या कंत्राटी कामगारांना सुटी दिली पाहिजे होती. तसेच इतके तातडीचे ऑप्टिकल फायबर रिपेअरचे काम करताना त्या ठिकाणी पूर्व तपासणी (work permit) दिले होते का? आत मध्ये काम करणाऱ्या कामगारावर लक्ष ठेवण्यासाठी मास्क आदी सुरक्षा यंत्रणा साहित्य कोणी जबाबदार अधिकारी अथवा कंत्राटी सुपरवायझर किंवा मदतनीस होता का? आदी गंभीर सवाल स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी विचारून त्या मृत्यूची जबाबदारी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे घेऊन पूर्ण तपास केला पाहिजे. तसेच हजारो कंत्राटी कामगार घातक ठिकाणी भूमिगत, धोकादायक परिस्थितीत काम करत असतात असे यावरून दिसून येत आहे. आणि हे वास्तव सर्वत्र आहे. 

स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना स्थापनेपासून कंत्राटी कामगार क्षेत्रात गेली काही वर्षे काम करत आहे, खाजगी आणि सरकारी उद्योगातील सर्व सुरक्षा कायदे कंत्राटी कामगारांना लागू आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे दरवर्षी अल्प वेतनात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे जीव जात आहेत. असा आरोप कामगार नेते जीवन येळवंडे यांनी केला आहे.

धोकादायक वातावरणात काम करणाऱ्या कंत्राटी मजुरांना सुरक्षा प्रशिक्षण, आवश्यक व्यक्तिगत संरक्षक साधने (PPE) दिली पाहिजेत तसेच त्यांच्या कामाशी संबंधित संभाव्य धोक्यांची माहिती करून देणे बंधनकारक आहे. नियोक्त्यांची जबाबदारी म्हणजे सुरक्षित कामकाजाचे वातावरण उपलब्ध करून देणे. तसेच कंत्राटदारांनी सुरक्षा नियमांचे पालन करणे आणि मजुरांपर्यंत धोक्यांची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. त्यामुळे जीवन येळवंडे यांनी काही सुरक्षा उपाययोजना बद्दल माहिती दिली आहे. 



कंत्राटी मजुरांच्या सुरक्षेचे महत्त्वाचे पैलूवर जीवन येळवंडे यांनी लक्ष वेधले आहे.

१. धोका ओळख व माहिती देणे

कंत्राटदारांनी कामाशी संबंधित संभाव्य धोके ओळखले पाहिजेत. मजुरांना त्या धोक्यांची माहिती देऊन आवश्यक प्रशिक्षण दिले पाहिजे

२. व्यक्तिगत संरक्षक साधने (PPE)

नियोक्त्यांनी कामानुसार आवश्यक PPE उपलब्ध करून दिले पाहिजे. रासायनिक पदार्थांच्या संपर्कासाठी "आय वॉश स्टेशन"सारखी सोय असावी.

३. सुरक्षा प्रशिक्षण

कंत्राटी मजुरांना काम सुरू करण्यापूर्वी सुरक्षा परिचय प्रशिक्षण (induction training) व कार्यसुरक्षा प्रशिक्षण दिले पाहिजे. विशेषतः धोकादायक वातावरणात प्रशिक्षण अनिवार्य आहे.

४. धोक्याचे मूल्यांकन (Risk Assessment)

नियमितपणे धोका मूल्यांकन केले पाहिजे. आढळलेल्या धोक्यांची माहिती कंत्राटदारांना देणे आवश्यक आहे.

५. आपत्कालीन तयारी (Emergency Preparedness)

कंत्राटदारांकडे आपत्कालीन प्रतिसाद व निवारण योजना असावी. ही योजना मजुरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

६. सुरक्षित काम पद्धती

साधनांचा योग्य वापर, उपकरणे हाताळणे व सुरक्षा नियमांचे पालन याबाबत मजुरांना प्रशिक्षण दिले पाहिजे. घातक कामावर सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे. विशेषता रासायनिक, CRITICAL WOEKING SPOTS, आदी ठिकाणी नियमांचे पालन व संभाव्य धोके ओळखणे सोपे कसे होईल याचा आढावा सतत घेतला पाहिजे, त्यासाठी स्वतंत्र SEFTY OFFICER  नियुक्त केले पाहिजेत.

८. प्रथमोपचार सुविधा

ज्या ठिकाणी कंत्राटी मजुरांकडून काम करून घेतले जाते, त्या सर्व ठिकाणी प्रथमोपचाराची सोय उपलब्ध असली पाहिजे.

९. काम थांबविण्याचा अधिकार

अभियंता-प्रमुख (Engineer-in-charge) यांना असे वाटल्यास की कामामुळे माणसांचा, मालमत्तेचा किंवा उपकरणांचा धोका आहे, तर त्यांना काम थांबविण्याचा अधिकार आहे.

कायदेशीर चौकट

व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कार्यस्थिती संहिता, २०१९ (Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2019) कामगारांच्या (कंत्राटी कामगारांसह) सुरक्षेशी व आरोग्याशी संबंधित सर्व कायदे एकत्र करून सर्वांग पूर्ण सुरक्षा कंत्राटी कामगारांसाठी असलीच पाहिजे. देशात सर्व कामाच्या क्षेत्रात कंत्राटीकरण झाले आहे. हा वर्ग गरीब आणि कमी शिकलेला आहे, असंघटित आहे. त्यामुळे सरकार आणि कामगार संघटनांनी कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र मंत्रालये स्थापन करायला हवीत. असे जीवन येळवंडे यांनी सांगितले.

कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम, १९७०

कंत्राटी कामगारांच्या रोजगाराचे नियमन करते व त्यांचे शोषण टाळते. राष्ट्रीय व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळ व्यावसायिक सुरक्षा व आरोग्यविषयक बाबींवर सल्ला देण्यासाठी कामाच्या ठिकाणी वर्क परमिट देताना धोक्याची जाणीव करून दिली पाहिजे. यामध्ये संबंधित कंपन्या आणि ठेकेदार संस्था यांना जबाबदारीने काम करावे लागेल. सुरक्षित व आरोग्यदायी कामाचे वातावरण उपलब्ध करून ही सर्वात मोठी कायदेशीर जबाबदारी आहे. कामगारांना नियुक्तीपत्र देणे. कारखाने, बांधकाम क्षेत्रात जोखमीविरहित कामाची व्यवस्था करणे. सुरक्षा नियम व मानकांचे पालन करणे. आवश्यक PPE व सुरक्षा उपकरणे पुरवणे. कंत्राटदार व कामगारांना संभाव्य धोक्यांची माहिती देणे. नियमित सुरक्षा तपासण्या व लेखापरीक्षण करणे. याबद्दल कायद्यात पूर्ण उल्लेख केलेले आहेत.

कामगारांचे कामावर असताना मृत्यू होणे, आणि त्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांच्या कुटुंबाचे कल्याण करणे ही कायदेशीर आणि मानवतावादी जबाबदारी बीएसएनएलने घेतलीच पाहिजे. असे स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी आकुर्डी येथे स्पष्ट केले आहे.

थोडे नवीन जरा जुने