पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - आम्ही पूर्णा नगर, शिवतेज नगर आणि परिसरातील नागरिक आपणास या पत्राद्वारे कळवू इच्छितो की येथील भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, या कुत्र्यांच्या खालील त्रासामुळे, उपद्रवामुळे आम्ही परिसरातील नागरिक अतिशय त्रस्त , वैतागलो आहोत.
१. दुचाकी , चार चाकीच्या मागे धावत जाणे.
२. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिक यांच्या अंगावर घोळक्याने धावून जाणे, प्रसंगी चावा घेणे, हल्ला करणे. यामुळे नुकत्याच जीवित हानी, प्राणहानी झालेल्या कितीतरी घटना आपण पाहिल्या आहेत.
३. रात्रभर भुंकत राहणे तसेच रात्रपाळी वरून येणाऱ्या नागरिकांवर भुंकणे, त्यांचा पाठलाग करणे.
४. सार्वजनिक उद्यानात नागरिकांच्या वॉकिंग ट्रॅक chya रस्त्यावर प्रातर्विधी करणे. ( परिणामी नागरिकांना अस्वच्छ वातावरणामुळे सकाळी उद्यानात व्यायामासाठी, फिरायला जाता येत नाही)
५. रस्त्याच्या मधोमध झोपणे.
६. नागरिकांच्या कचऱ्याच्या डब्यातील कचऱ्याच्या पिशव्या इतरत्र नेऊन टाकणे (रोगराईला आमंत्रण)
घराबाहेर पडल्यावर या भटक्या कुत्र्यांच्या जीव घेण्या हल्ल्याच्या भीतीने नागरिकांना जीव मुठीत ठेवून रस्ता ओलांडावा लागतो, वावरावे लागते.
तरीही वरिष्ठ पातळीवर याची दखल घेऊन , आवश्यक त्या उपाय योजना करून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची मीटिंग बोलवून नागरिकांच्या आरोग्याशी, जीवाशी निगडित हा अतिशय महत्वाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावावा ही आम्हा परिसरातील नागरिकांतर्फे कळकळीची विनंती या निवेदनाद्वारे आम्ही करत आहोत. या निवेदनाच्या प्रति अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.
१.आयुक्त सर , पिंपरी चिंचवड, पुणे
२. पशु वैद्यकीय अधिकारी
३. पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका४. उपआयुक्त, पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
५. मा. विभागीय आयुक्त, पुणे संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत