पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - दि. १२ : पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, पिंपळे सौदागर येथे झोन ९ मधील सर्व क्लबच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर अँक्टिव्ह यांनी केले. कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी व सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विशेष सहभाग – माधवबाग क्लिनिकचे डॉक्टर, क्लबचे सिक्रेटरी Ln Dr. ज्योती क्षीरसागर व त्यांची टीम, Ln जाबिन पठाण व त्यांची टीम, डेंटल क्लिनिक टीम, तसेच आय चेक-अप डॉक्टर्स. उपस्थित होते.
मान्यवर उपस्थिती – District Governor MJF लायन राजेश अग्रवाल, PDG MJF लायन अभभय शास्त्री, ZC लायन उज्ज्वला कुलकर्णी, विविध लायन्स क्लब्सचे पदाधिकारी LCP फोनिएक्स क्लबचे प्रेसिडेंट लायन प्रसाद दिवाण, सेक्रेटरी वल्लारी पाठक, खजिनदार शिल्पा पारेख, एलसीपी अकुर्डी अग्रसेन चे प्रेसिडेंट लायन अरुणा गुप्ता,सेक्रेटरी लायन अनुपमा अग्रवाल एलसीपी पिंपरी हॅपिनेस चे प्रेसिडेंट लायन महेष थवानी, एलसीपी पुणे सेलिब्रेशनचे चार्टर मेम्बर लायन शेषी कदम, एलसीपी निगडी सप्फायर क्लबचे चार्टर खजिनदार लायन योगेश वाके, PK International School चे चेअरमन जगन्नाथ आप्पा काटे, Unnati Social Foundation चे चेअरमन कुंदा भिसे यांनीही भेट दिली. सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
क्लबमधील सर्व पदाधिकारी —
President लायन बालाजी जगताप
Secretary लायन Dr. ज्योती क्षीरसागर
Treasurer लायन जितेंद्र हिंगणे, MJF लायन सुनील जाधव, लायन दीपक सोनार , लायन संजय सोनार , लायन शिरीष हिवाळे, लायन प्रा. शकूर सय्यद, लायन योगेश नाईक, लायन अंजुम सय्यद मॅडम, लायन धनंजय माने उपस्थित होते.
या शिबिरात ६५० ते ७०० विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेतर्फे President लायन बालाजी जगताप यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
प्रेसिडेंट लायन बालाजी जगताप यांनी मनोगत मांडले की, असे उपक्रम वर्षभर चालु राहातील. अशा उपक्रमांत क्लब सदस्यांचा सक्रिय सहभाग कायम राहाणार असे सांगितले.