ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 500 जागांसाठी भरती

Recruitment-for-500-posts-Oriental-Insurance-Company-Limited-OICL-Assistant


OICL Assistant Recruitment 2025 :
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Oriental  Insurance Company Limited) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

रिक्त पदांची संख्या आणि तपशील

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘सहाय्यक श्रेणी ३’ या पदाच्या एकूण 500 रिक्त जागांसाठी उमेदवारांना संधी आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) उमेदवाराने एसएससी/एचएससी/इंटरमीडिएट/पदवी स्तरावर इंग्रजी विषयांपैकी एक विषय म्हणून उत्तीर्ण झालेला असावा. iii) उमेदवारांकडे 31 जुलै 2025 रोजी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा)

या भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा. तसेच नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही असू शकते.

अर्ज शुल्क आणि वेतन

जनरल/ओबीसी उमेदवारांना 850 रूपये तर SC/ST/दिव्यांग/माजी सैनिक उमेदवारांना 100 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, नियुक्त झालेल्या उमेदवारांना 22,405 ते 62,265 वेतन मिळणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 त्यामुळे शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे.

तसेच प्रिलिम्स परीक्षेची तारीख 07 सप्टेंबर 2025 मध्ये होणार असून मुख्य परीक्षेची तारीख 28 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे.

शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

महत्वाच्या लिंक

-----------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा

-----------------------------------------------------------

● महत्वाच्या सूचना :

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2025

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Recruitment-for-500-posts-Oriental-Insurance-Company-Limited-OICL-Assistant
थोडे नवीन जरा जुने