देवराम लांडे यांच्या मिरवणुकीत अपघात, एकाचा मृत्यू ; लांडे यांना अटक

Accident in Devram Lande's procession, one dead; Lande arrested


जुन्नर (रफिक शेख) : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य मिरवणुकीदरम्यान जुन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खालच्या गेटजवळ डीजेचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाइकांनी आणि नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची आणि देवराम लांडे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत अनेक झांझपथक, डीजे आणि शक्तीप्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रॅलीला प्रचंड गर्दी जमली होती. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात डीजेचा अपघात घडला, ज्याने हा आनंदोत्सव शोकांतिकेत बदलला.

या अपघातात मुक्तादेवी तरुण मित्र मंडळ झांझपथक, खामगाव येथील २१ वर्षीय तरुण आदित्य सुरेश काळे यांचा मृत्यू झाला, किशोर रामचंद्र घोगरे, बाळू किसन काळे, गोविंद शंकर काळे, सागर सुनिल केदारी, विजय हिरामन केदारी, सचिन गणपत केदारी आणि अन्य जखमी झाले. सर्व जखमी हे खामगाव येथील मुक्तादेवी तरुण मित्र मंडळ झांझपथकाचे सदस्य आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला, मृत तरुणाचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत जुन्नर पोलिस ठाण्या बाहेर ठिय्या दिला. त्यानंतर देवराम लांडे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून देवराम लांडे यांना अटक करण्यात आल्याची माहिती जुन्नर पोलिसांनी दिली आहे.

Accident in Devram Lande-procession-one-dead-Lande-arrested

थोडे नवीन जरा जुने