पिंपरी चिंचवड : प्रिझम फाउंडेशन विशेष शिक्षण कै. पद्मजा गोडबोले आंतरशालेय कविता पाठांतर स्पर्धा २०२५-२६ दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या आंतरशालेय कविता पाठांतर स्पर्धेमध्ये अभिराज फाउंडेशनच्या रुद्र जाधव, आरुष धायगुडे, संतोष कोळी,साहिल देशपांडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धत लॉक स्कूल, नवक्षितिज स्कूल, अभिराज फाउंडेशन, NDA, संस्कार प्रतिष्ठान,जीवन ज्योत, सेवासदन दिलासा केंद्र, अब नॉर्मल होम, निराधार कार्यशाळा,Fovs कार्यशाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
अभिराज फाउंडेशनच्या रुद्र जाधवला 8ते 11 वयोगटातील तृतीय क्रमांक मिळाला व संतोष कोळी ला 12 ते 15 वयोगटात तृतीय क्रमांक मिळाला. या विद्यार्थ्यांना भाग्यश्री कापसे, वैशाली खेडेकर,योगिता वंजारी, विद्या रुपणाळकर यांनी मार्गदर्शन केले होते. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता चव्हाण, अभिराज फाउंडेशन चे डायरेक्टर रमेश मुसूडगे, स्वाती तांबे यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.