पिंपरी चिंचवड - श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेज नगरच्या, चिंचवड वतीने नवरात्रीच्या निमित्ताने समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला भगिनींना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हे पुरस्कार विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे व योगगुरु शैलेजा भाले गायत्री माँ व डॉ. प्राजक्ता रोहमारे यांच्या हस्ते नवदुर्गांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक वैधकीय, कला, क्रीडा, सहकार, व्यवसाय, शासकीय, शैक्षणिक, धार्मिक इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या नवदुर्गांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले.
आमदार उमाताई खापरे म्हणाल्या की, कर्तृत्वान महिलांची दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिल्याबद्दल प्रतिष्ठानचे त्यांनी कौतुक केले. यामुळे या महिला अधिक चांगल्या पद्धतीने काम करतील...
याप्रसंगी नगरसेविका योगिता नागरगोजे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. हरि नारायण शेळके काका, महिला मंडळाच्या अध्यक्ष्या स्नेहा गुणवंत, उपस्थित होत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष सारिका रिकामे यांनी केले.
सूत्रसंचालन तेजस्विनी बडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. हरिनारायण शेळके यांनी केले.