पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - मराठवाडा जनविकास संघ आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित मराठवाडा मुक्तीसंग्राम महोत्सव आणि पूरग्रस्त सद्भावना सोहळ्यात धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी सात लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आला.
या निधीचे संकलन संस्था अध्यक्ष अरुण पवार यांच्या आवाहनानंतर झाले असून, तो तत्काळ पूरग्रस्तांना वितरित केला जाणार आहे. तसेच मराठवाडा समन्वय समिती पुणेचे राजकुमार दुर्गुडे पाटील
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व श्रद्धांजली अर्पणाने झाली. या वेळी प्रा. डॉ. भाऊसाहेब जाधव, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. विवेक मुगळीकर, प्रा. श्रीपाल सबनीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या विरोधात मुक्तीसंग्रामाची प्रेरणा वापरण्याचे आवाहन केले, तर डॉ. तात्याराव लहाने यांनी मराठवाड्याच्या एकतेचे कौतुक करत एकत्रित प्रयत्नांमुळे कोणतेही संकट पार करता येते असे मत व्यक्त केले.
पुरस्कार वितरण समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांना "मराठवाडा भूषण पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. यात प्रमुख पुरस्कारप्राप्त विजेते पुढीलप्रमाणे:
ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे – सांप्रदायिक पुरस्कार
डॉ. पुरुषोत्तम वायाळ – कृषि पुरस्कार
अमर सूर्यवंशी (आदर्श सरपंच) – ग्रामविकास पुरस्कार
धैर्यशील बुवा (पीएमआरडीए) – प्रशासकीय पुरस्कार
डॉ. अमोल विद्यासागर – साहित्य पुरस्कार
अनिल कुलकर्णी – उद्योगरत्न पुरस्कार
सुमीत भोसले – मल्लरत्न पुरस्कार
प्रियांका इंगळे – क्रीडा पुरस्कार
प्रिया कदम-भगत – महिला सक्षमीकरण पुरस्कार
डॉ. दिनेश गाडेकर (YCM) – वैद्यकीय पुरस्कार
अशोक पाखरे (सरपंच) – सामाजिक कार्य पुरस्कार
सुरेश कदम – संगीतरत्न पुरस्कार
मोहन जाधव – पत्रकारिता पुरस्कार
सूरज मांजरे – विशेष पुरस्कार
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शाहूराज कदेरे यांनी मानले.