PCMC : देशात स्त्रियांचा सन्मान होणे, तिला समानतेचे अधिकारी दिल्यामुळे मागील दोन दशकात स्त्रियांनी विविध क्षेत्रात कौतुकस्पद कामगिरी केली आहे - सोनाली मन्हास


पिंपरी चिंचवड : भारतात स्त्रियांना विविध संधी प्राप्त झाल्या आहेत. व्यवसाय आणि नोकरीच्या विविध क्षेत्रात महिलांनी सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करण्यास मोठा हातभार लावला आहे, स्त्रिया  देशाच्या प्रगल्भ संस्कृतीचे लक्षण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रीचे स्थान मोठे आहे. प्रत्येक पुरुषाने जर-स्त्रीचा सन्मान केला तर तो देश महासत्तेकडे वाटचाल करेल, सरकारने आणि भारतीय संविधानाने  महिलाना समतेचा अधिकार देऊन एक मोठी सामाजिक क्रांती केली आहे. असे प्रतिपादन वुई टूगेदर फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सोनाली  मन्हास यांनी प्राधिकरण येथील नवदुर्गांचा सन्मान कार्यक्रमात केले.

नवदुर्गांचा गौरव सोहळा - स्त्रीशक्तीचा सन्मान

प्राधिकरण, संभाजी चौक:

भारतीय स्त्रीशक्ती व मैत्रीण कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने "नवदुर्गांचा सत्कार" हा भव्य कार्यक्रम नुकताच प्राधिकरण येथील संभाजी चौकात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वास दाद देण्यात आली.

या प्रसंगी वुई टूगेदर फाउंडेशन च्या सोनाली दारासिंग मन्हास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत संघटनेचे सचिव श्री. जयंत कुलकर्णी, खजिनदार श्री. दिलीप चक्रे, कार्यकारिणी सदस्य श्री. सलीम सय्यद, श्री. झाकीर सय्यद आणि दारासिंग मन्हास यांचीही उपस्थिती लाभली.

मंचावरून भाषण करताना सौ. सोनाली मन्हास यांनी नवरात्र व देवीच्या नऊ रूपांमागील संकल्पना स्पष्ट करत स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंची माहिती दिली.
"आदिशक्ती च्या प्रत्येक एक रूपाचे नवरात्रीत आपण पूजन करतो तेंव्हा त्यांच्यातील गुणांना अंगीकारले तर प्रत्येक स्त्री मधील दुर्गा जागृत होऊन स्वतःला कुटुंबाला व समाजाला घडवू शकेल.

*जसे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तसेच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या यशामागेही एक मजबूत पुरुषाचा पाठिंबा असतो," असे सांगत त्यांनी आपल्या यशात पतीचा महत्त्वाचा वाटा असल्याचे नमूद केले.

शेवटी, त्यांनी आपल्या संघटनेच्या कार्याची व उद्दिष्टांची माहिती देत उपस्थित महिलांना प्रेरणा दिली व सामाजिक कामात सहभागी होण्याचे आवाहन केले.

स्त्रीशक्तीचा हा गौरवसोहळा उपस्थित सर्व मान्यवर, महिला आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.

भारतीय स्त्री शक्तीच्या अध्यक्ष स्मिता मोडक सचिव मनाली जोशी तसेच मैत्रीण कट्टा च्या ॲडमिन्स स्वाती काळभोर आशा पोलकडे व श्रीदेवी नारूनी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिता कच्छवा यांनी केले. 

कार्यक्रमात अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय महिलांचा गौरव करण्यात आला.




त्यामध्ये –

🔸 उत्कर्षा कुलकर्णी - शून्यापासून सुरुवात करून आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या उद्योजिका.

🔸 सौ. शिंदे (काळेवाडी पोलीस ठाणे) आणि सौ. कदम (चिखली पोलीस ठाणे) – कर्तव्यनिष्ठ महिला पोलीस कर्मचारी.

🔸 सौ. राऊत – 'किचन क्वीन' म्हणून प्रसिद्ध, ज्या महिलेनं गणेशोत्सवात तब्बल 7.5 लाख मोदक विकून मोठ्या प्रमाणात नफा कमावला.

🔸 तसेच तीन सफाई कामगार महिला – समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या महिला, या सर्व नवदुर्गांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

शेवटी, त्यांनी आपल्या संघटनेच्या कार्याची व उद्दिष्टांची माहिती देत उपस्थित महिलांना प्रेरणा दिली व सामाजिक कामात सहभागी होण्याचे आवाहन केले.

स्त्रीशक्तीचा हा गौरवसोहळा उपस्थित सर्व मान्यवर, महिला आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.

थोडे नवीन जरा जुने