पिंपरी चिंचवड - पिंपळे सौदागर येथे Lions Club of Pimple Saudagar Active व Unnati Social Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात अनेक लायन सदस्य व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
क्लबचे अध्यक्ष लायन बालाजी जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आजची ही सामाजिक उपक्रम Lions Club of Pimple Saudagar Active आणि Unnati Social Foundation यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आली असून, सुमारे ६७ रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन आपले सामाजिक कर्तव्य बजावले. यापुढेही अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम नियमितपणे राबवले जातील.”
या शिबिराला उपस्थित मान्यवर लायन सदस्यांमध्ये खालील लायन्सचा समावेश होता.
Ln. धनंजय माने, MJF Ln. हृषिकेश देवरे, Ln. योगेश नाईक, Ln. शोभा कदम, Ln. गुलशन नाईकुडे, Ln. भाग्यलक्ष्मी कटारी, Ln. भारत अंकुशे, Ln. अरुण इंगळे, Ln. प्रकाश कापरे, Ln. अशोक हुग्गार यांनी रक्तदान करणाऱ्या सर्व लायन सदस्य व सामान्य नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या उपक्रमासाठी जागेची सुविधा आणि सहकार्य उपलब्ध करून दिल्याबद्दल उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. कुंदाताई भिसे व श्री. संजय भिसे यांचे विशेष आभार मानण्यात आले.
तसेच या शिबिराला ZC MJF Ln. उज्ज्वला कुलकर्णी यांचीही उपस्थिती लाभली.
रक्तपेढीचे श्री. शाहापूरकर सर यांचे देखील मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
"एक रक्तदान = अनेकांचे जीवनदान"
धन्यवाद,
Lion Balaji Jagtap – President
Lion Dr. Jyoti Kshirsagar – Secretary
Lion Jitendra Hingne – Treasurer
Team – Lions Club of Pimple Saudagar Active