PCMC : पुणे लोणावळा तीसरी व चौथी रेल्वे मार्गीका बाबत अखेर नगर विकास विभागाने परिपत्रक जारी केले

 


 पिंपरी चिंचवड - चिंचवड ता 23  : पुणे लोणावळाची  63.87 किलोमीटर लांबी व 17 रेल्वे स्थानके असलेल्या मार्गावर 11 मार्च 1978, 1982, 1985 व 1987 सालात मध्य रेल्वे विभागाचे  चार युनिट लोकल सुरू करण्यात आल्या.  चिंचवड येथे थांबणारी मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस 1983 साली अचानक  बंद केली. रात्री दोनच्या सुमारास सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस गाडीला थांबा होता .तसेच पुणे मुंबई दरम्यान  पॅसेंजर गाडी एवढ्याच गाड्यांना चिंचवड येथे थांबा होता . पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांना पुणे किंवा मुंबईकडे जाऊन  एक्सप्रेस गाड्या पकडाव्या लागत होत्या. प्रवाशियांचे  आर्थिक, शारीरिक हाल होत होते. तासंतास वेळ त्यांच्या वाया जात होता . शहरवासीयाना दूर शहर , गावाचे रेल्वे तिकिटाचे आरक्षणासाठी पुणे रेल्वे स्थानकावर जावे लागत होते. 

त्याची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी चिंचवड प्रवासी संधाच्या वतीने रेल्वेमंत्री ,खासदार, आमदार, रेल्वे अधिकाऱ्यांना भेटी घेत लेखी सख्याचे  निवेदने पत्रे अनेक वेळा दिले. त्याला फारसा उपयोग झाला नाही . प्रवासीयांच्या सुविधा होत नाही हे पाहून 1989 साली चिंचवड रेल्वे स्थानकावर बेमुदत उपोषण सात जणांनी सुरू केले. 1990 साली  आत्मदहनाच्या इशारा रेल्वेमंत्री , रेल्वे विभागाला दिला . पुढे सत्याग्रही म्हणून दहा जणांनी सहा दिवसाचा येरवडा येथे कारावासही भोगला. दरम्यान कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस , पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेसला  चिंचवड येथे थांबा दिला.  

1996  साली  चिंचवड येथे आरक्षण केंद्र ची मागणी पूर्ण केली.आज  इतर चार एक्सप्रेस गाड्याना  आज चिंचवड येथे थांबा मिळविला .परंतु पुणे लोणावळा मार्गावर लोकल वाढ व्हावी सकाळी व सायंकाळी दर वीस मिनिटांनी लोकल सोडण्यात यावी ही मागणी रेल्वे प्रशासनाने कधीच पूर्ण केली नाही .त्यांनी चिंचवड प्रवासी संघाला पाठविलेल्या लेखी पत्रात मुंबईतच लोकल कमी पडतात ; नवीन रेक उपलब्ध झाल्यावर पुणे लोणावळा मार्गावर नवीन लोकल सुरू करू असे वेळोवेळी कळविले. स्थानिक खासदार कै . गजानन बाबर , माजी संरक्षण मंत्री शरद पवार , विद्यमान खासदार श्रीरंग बारणे , सुप्रीया सुळे, डॉ अमोल कोल्हे , आमदार  आदींनीही पाठपुरावा केला. परंतु त्याला यश पदरी पडत नव्हते .रेल्वे प्रशासनाने शेवटी पुणे लोणावळा दुहेरी रेल्वे मार्ग आहे. लोकल वाढ साठी स्वतंत्र दोन मार्गीकाची आवश्यकता आहे. पुणे रेल्वे स्थानकात सहा प्लॅटफॉर्म आहेत. दररोज 150 गाड्यांची येजा सुरू आहे. माल गाड्यांच्याही त्यात समावेश आहे. अशी कारणे पुढे करण्यात आली.

 दुसरीकडे औद्योगीकरणामुळे पिंपरी चिंचवडच्या लोकसंख्येत प्रचंड वाढ होत होती. पुणेची 55 लाख तर पिंपरी चिंचवड ची 40 लाख लोकसंख्या झाली आहे .रस्ते मार्गावरील अपूरी प्रवासी  बस व्यवस्था, वाहतुकीची कोंडीमुळे  पुढे 2008 नंतर मेट्रोचा पर्याय पुढे आला असला तरी ,लोकलच्या फेऱ्यात  1987 सालापासून वाढ करण्यात आली नाही .लोकल ने दररोज एक लाख प्रवाशांची चढउतार विविध स्थानकात होते. विद्यार्थी, महिला, कष्टकरी,व्यापारी, कामगार, सर्वसामान्य प्रवासी, सरकारी नियम सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना  सन  2017 सालाचे रेल्वेमंत्री व विद्यमान रेल्वे मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी तिसऱ्या व चौथ्या मार्गीकांना मान्यता दिली. त्याचे  सर्वेक्षण झाले. त्यावेळी 4300 कोटी रुपये खर्च येणार होता. केंद्र, राज्य सरकार, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका नी  त्यांच्या आर्थिक वाटा दिल्याशिवाय रेल्वे प्रशासन काहीच करू शकणार नाही अशा बातम्या पुढे प्रसिध्द झाल्या त्या वेळी  पुणे महापालिकेला 375 कोटी व पिंपरी चिंचवड महापालिकेला अंदाजे 250 कोटी रुपये देणे अपेक्षित होते. परंतु दोन्ही महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विषय थंड वासनात गुंडाळून ठेवला. त्यातच  मेट्रो तर पिंपरी चिंचवड महापालिका ते शिवाजीनगर पर्यंत धावणार होती त्याला प्रवाशांचा प्रथम प्रतिसादच मिळत नव्हता. प्रवासी संधाला 2019 साली  कोरोना प्रादुर्भाव सुरू झाला असताना  सरकारकडे वित्तीय  महसूल कमी असल्याचे कारण पुढे करून पुणे लोणावळा चौपदरीकरण कडे पूर्णपणे दुर्लक्ष केले .दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने लोकल फेऱ्याच्या संख्येत  पुणे लोणावळा मार्गावर कपात केली दुपारी बारा ते तीन वाजून 30 मिनिटापर्यंत लोकलच पुणे लोणावळा मार्गावर धावत नव्हती आजही धावत नाही. पुणे रेल्वे स्थानकातून सुटणारी लोकल शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरून सुरू केली त्यात प्रवासीयांना आजही अनेक समस्यांना जावे लागत आहे.

कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस,बारामती कर्जत शटल,  सोलापूर मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस पुणे भुसावळ नाशिक मार्गे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या देखील  प्रवाशांच्या सुरक्षेतेचे कारण देऊन रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात बंद केल्या त्या आजतागायत सुरू करण्यात आल्या नाही. आजही प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे .त्याला पुणे जिल्ह्यातील खासदार, रेल्वेमंत्री, रेल्वे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही वेळ आली आहे.

    काही दिवसापूर्वी केंद्र सरकार रेल्वे मंत्रालयाने तिसरी व चौथी रेल्वे मार्गीका  पुणे लोणावळा दरम्यान विकसित करण्याची घोषणा केली. यासाठी  5100 कोटी रुपये खर्चाचा केंद्र 50 टक्के व  राज्य सरकार याचा निम्मा खर्च 50 टक्के उचलणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती . पुणे लोणावळ मार्गीकेला राज्य सरकारची मान्यता आवश्यक होती राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे  यांनी देखील मंत्रीमंडळाच्या बैठकीत  घोषणा केली.

पुणे लोणावळा दरम्यान उपनगरी व रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गीका  उभारणी प्रकल्पासाठी मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव मुंबई रेल विकास कार्पोरेशन लिमिटेड (एम आर पी सी ) या केंद्र व राज्य शासनाचा अनुक्रमे (51. 49 टक्के ) संयुक्त उपक्रम असलेल्या महामंडळामार्फत राज्य शासन प्राप्त झाला होता. त्यास अनुसरून पुणे लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गी का प्रकल्पाची रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहभागाने अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुसंघाने शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने परिपत्रक जारी केल्यामुळे प्रत्यक्ष कामाला आता गती मिळणार आहे

     दिनांक 11 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार पुणे लोणावळा तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गे विका प्रकल्पामधील गुंतवणुकीचे वेळापत्रक 2025 ते 2029  दरम्यान पुढील प्रमाणे असणार आहे केंद्र शासनाचा सहभाग 50 टक्के  असून 2550 कोटी ,  राज्य शासनाचा सहभाग 50 टक्के प्रमाणे 2550 कोटीचा असणार आहे . दरवर्षी ठराविक रक्कम देय स्वरूपात असणार आहे. त्यात .  765 कोटी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सहभाग 765  कोटी ,पुणे महानगरपालिकेचा सहभाग 510 कोटी,  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहभाग 510 कोटी  प्रमाणे एकूण प्रकल्प किंमत 5100 कोटी रुपये असणार असल्याचे  महाराष्ट्र राज्याचे नगर विकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

     चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामली भालदार पदाधिकारी मुकेश चुडासमा, मनोहर जेटवानी, नंदू भोगले, निर्मला माने ,सल्लागार अँड. मनोहर सावंत, डॉ राजेश मेहता, दादासाहेब माने , डॉ . राजेंद्र कांकरिया  यांनी राज्य शासनाचे आभार मानले .तसेच येत्या पाच वर्षात पुणे लोणावळा मार्गावर तिसरी व चौथी मार्गीका बाबत प्रत्य कामाच्या अंमलबजावणी बाबतही देखरेख करून वेळोवेळी तसे निर्णय प्रवासी यांच्या हितासाठी घेण्यात येणार आहे.

   रावेत येथे वाढत्या लोकसंख्येमुळे स्थानिक नागरिकांना वाहतूकीच्या अनेक समस्याना आज जावे लागत आहे . यासाठी  आकुर्डी व देहूरोड मध्ये नवीन रेल्वे स्थानक निर्माण करण्यात यावे यासाठी गेली काही वर्षे पाठपुरावा करण्यात येत आहे . तसेच  कोरोना काळातील बंद एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात एक्सप्रेस गाड्यांना चिंचवड येथे थांबा मिळावा. आदी प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने करण्यात येणार आहे.

थोडे नवीन जरा जुने