नागपुरात चक्क घराच्या बाल्कनीतून गेला उड्डाणपुल, व्हिडिओ व्हायरल

flyover-went-through-the-balcony-of-house-in-Nagpur


नागपूर : नागपूर शहरातील पारडी भागात नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे एकच खळबळ उडाली आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे काही स्थानिक रहिवाशांच्या घरांच्या बाल्कनीमध्ये उड्डाणपुलाचा काही भाग पोहोचला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने स्थानिक प्रशासन आणि बांधकाम यंत्रणेच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नागपूर शहरात गेल्या काही वर्षांपासून रस्ते आणि उड्डाणपुलांच्या बांधकामाला गती मिळाली आहे. याचाच एक भाग म्हणून पारडी भागात भंडारा रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नव्या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाले. हा उड्डाणपूल 2025 मध्ये पूर्णत्वास गेला असून, त्याचे उद्घाटनही नुकतेच झाले आहे. मात्र, या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे स्थानिक रहिवाशांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. काही घरांच्या बाल्कनी पर्यंत उड्डाणपूल आहे, रहिवाशांना आपल्या घराच्या खिडक्या आणि बाल्कनी उघडणेही अवघड झाले आहे.

रहिवाशांचा संताप

या उड्डाणपुलामुळे प्रभावित झालेल्या रहिवाशांनी स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, बांधकामापूर्वी योग्य सर्वेक्षण आणि रहिवाशांशी चर्चा न करता हे काम हाती घेण्यात आले.

flyover-went-through-the-balcony-of-house-in-Nagpur

थोडे नवीन जरा जुने