- भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना
- पिंपरी-चिंचवडमधील विजया दशमी सोहळ्यांत सहभाग
पिंपरी-चिंचवड - अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणारा विजया दशमी दसरा… आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करण्याची प्रेरणा देतो. रावणासारख्या अहंकाराचा नाश होवो आणि रामासारखा सद्गुण नांदू दे! असा संकल्प आम्ही केला आहे. यावर्षीचा विजया दशमी उत्सव संस्मरणीय ठरला, अशा भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत.
महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन व शिवांजली सखी मंच यांच्या पुढाकाराने भोसरी येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. दहा दिवस विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच, स्त्री-शक्तीचा जागर करण्यात आला. शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच उद्योग-व्यापार क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार लांडगे यांनी आयोजित केलेल्या दुर्गा उत्सवाला भेट दिली .
विजया दशमी दसऱ्याच्या निमित्ताने शहरातील विविध मंडळे, लोकप्रतिनिधी यांनी आयोजित केलेल्या उत्सवाला आमदार लांडगे यांनी उपस्थिती दर्शवली. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने पिंपळे सौदागर येथे भव्य रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो जनसमुदायाच्या उपस्थितीत या पारंपारिक सोहळा दिमाखात संपन्न झाला. रावणाच्या प्रतिकृतीचे दहन म्हणजे आपल्यातील वाईट आचार - विचार, अनिष्ट रूढी परंपरा यांचे दहन करण्यात आले.
आमदार लांडगे म्हणाले की, ‘‘विजया दशमी दसरा’’ निमित्त भोसरी विधानसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता आले. शहराचे मा. महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने भव्य नवरात्री उत्सव आणि रावण दहन कार्यक्रम झाला. या सोहळ्याला हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवली.
टाळगाव चिखली, जाधववाडी येथील रामायण मैदानातील हा सोहळा संस्मरणीय ठरला. निगडी येथे क्रांतिवीर मित्र मंडळ ट्रस्ट आणि मा. नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांच्या पुढाकाराने विजया दशमी दसऱ्यानिमित्त रावण दहळ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच, जबळ मैदान नेवाळेवस्ती, चिखली या ठिकाणी चांगभलं प्रतिष्ठान आणि सागर थोरात यांच्या पुढाकाराने औरंगजेबरुपी रावण दहन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त मर्दानी खेळ, महाराष्ट्राची लोकपरंपरा नृत्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे आणि ढोल-ताशांचा निनाद अशा कार्यक्रमाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. चिखली येथील मा. नगरसेविका साधना मळेकर आणि शिवगर्जना प्रतिष्ठाण यांच्या वतीने आयोजित भव्य रावण दहन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
दुर्गामाता महादौड… शौर्य आणि संस्कृतीचे प्रतिक…
विजयादशमीच्या पवित्र पर्वावर, श्री शिवप्रतिष्ठान हिन्दूस्थानचे गुरूवर्य संभाजी भिडे गुरूजी यांच्या प्रेरणेने आयोजित श्री दुर्गामाता महादौड २०२५ हा भव्यदिव्य सोहळा अपार उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या उत्सवात आमदार महेश लांडगे यांनी सक्रीय सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी येथून निघालेल्या या ऐतिहासिक दौडीचा समारोप श्रीमान मोरया गोसावी मंदिर पटांगण, चिंचवडगाव येथे झाला. हजारो तरुणांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आणि संपूर्ण परिसर जय भवानी..! जय शिवराय..! जय दुर्गामाता..! या घोषणांनी दणाणून गेला. ही महादौड एकता, शिस्त, देशभक्ती आणि हिंदवी संस्कृतीचे जिवंत दर्शन होती.
प्रतिक्रिया :
‘‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।’’ जय घोष करीत अनुशासन, शिस्त आणि राष्ट्र प्रेमाला समर्पित भावनेतून मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित विश्वातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षे पूर्ण करत आहे. राष्ट्रभक्तीच्या संस्कारांनी लाखो स्वयंसेवकांना घडवून, निःस्वार्थ समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्र आणि समाजाच्या उन्नतीसाठी अखंड कार्यरत असणाऱ्या या मातृसंस्थेला त्रिवार अभिवादन करता आले. त्यामुळे यावर्षीचा विजया दशमी उत्सव माझ्यासाठी खास होता.
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.