पिंपरी चिंचवड - 8 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई गोरेगाव येथील गोरेगाव स्पोर्ट क्लब मध्ये झालेल्या सोळाव्या दिव्यांग महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस स्पर्धेमध्ये अभिराज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय कामगिरी करत 1 गोल्ड, 2 सिल्वर व 2 ब्रांझ पदके मिळवून अभिराज फाउंडेशन चे नावलौकिक केले.
यामध्ये प्रामुख्याने संतोष कोळी गोल्ड, ऋषी मल्होत्रा सिल्वर, कृष्णा पाटील सिल्वर आरुष धायगुडे ब्रांझ, हर्ष खेनंट ब्रांझ, या दिव्यांग खेळाडूंनी एकूण 5 पदके मिळवली यांना मार्गदर्शन केले होते क्रीडा शिक्षक श्री विकास जगताप व श्री ऋषिकेश मुसूडगे यांनी या विद्यार्थ्यांच्या रमेश मुसूडगे व स्वाती तांबे यशाबद्दल संस्थेचे डायरेक्टर, मुख्याध्यापिका अनिता चव्हाण व सर्व कर्मचारी व पालकांनी या विद्यार्थ्यांचे व क्रीडा प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

