आळंदी (अर्जुन मेदनकर) : स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान, चाकण येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
या वेळी मनिषा सुरेशभाऊ गोरे यांना चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.
उपमुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणाले, “या लाडक्या बहिणीला बिनविरोध निवडून द्या — हीच खरी स्व. सुरेशभाऊंना श्रद्धांजली ठरेल.”
यावेळी शिंदे साहेबांनी चाकण परिसरात झालेल्या विविध विकासकामांचा उल्लेख करत सांगितले की, स्व. सुरेशभाऊ गोरे यांच्या संकल्पनेतील चाकण शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्या कामाची गतीने प्रगती सुरू आहे. तसेच, चाकण नगरपरिषदेच्या वाढीव कर रचनेला स्थगिती देण्याचा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
याच बरोबर श्री शिंदे यांनी चाकण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितिनभाऊ गोरे यांनी चाकण शहरात पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत वाहतूक पोलिसांकडून होणारी टोईंग वॅनची कारवाई तात्पुरती थांबवण्याची विनंती केली. यावर शिंदे साहेबांनी तत्काळ प्रतिसाद देत पोलिस आयुक्तांना ही कारवाई थांबविण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास विधानपरिषद उपसभापती मा. निलम गोऱ्हे, माजी मंत्री आमदार विजयबापू शिवतारे, शिवसेना सचिव राम रेपाळे साहेब, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीनभाऊ गोरे, चाकण नगरपरिषदेच्या नगर-अध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती मनिषा सुरेशभाऊ गोरे, उपजिल्हा प्रमुख प्रकाशदादा वाडेकर, ज्योती अरगडे, कृ.उ.बा.समिती सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, मा. सरपंच मारुती सातकर, संचालक माणिक गोरे, शिवसेना शहर प्रमुख महेश शेवकरी, माजी नगराध्यक्ष मंगल गोरे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, तसेच नगरसेवक प्रवीण गोरे, निलेश गोरे, अशोक बिरदवडे, सुनील नायकवाडी, संजय नायकवाडी, समीर सिकीलकर, शाम राक्षे, धीरज केळकर, शांताबाई गोरे, संगीता गोरे, प्रिया गोरे, संध्या गोरे, अनिता गोरे यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
