पिंपरी चिंचवड - वुई टुगेदर फाउंडेशन आणि ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर ईशा नेत्रालय हॉस्पिटल चिंचवड येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये १५ वर्षापेक्षा अधिक अनुभव असलेले डॉक्टरानंकडून जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक मशिनद्वारे सगळ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली तसेच सर्जन डॉक्टर वैभव अवताडे(रेटिना व मोतीबिंदू) स्पेशालिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली डोळ्यांचे आजार व वर्षातून एकदा डोळे तपासणी का गरजेची आहे यावर मार्गदर्शन केले तसेच रुग्णाच्या शंकांचेही निरसन केले.
या शिबिरास शहरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
हॉस्पीटल मार्केटिंग हेड अँड वर्क कोर्डिनेटर गणेश कांबळे यांनी सर्व नागरिकांना हॉस्पिटल विषयी विस्तृत माहिती दिली.
वुई टूगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, सचिव जयंत कुलकर्णी, सह सचिव मंगला डोळे- सपकाळे, रवींद्र सागडे, सलीम सय्यद, रवींद्र काळे, अर्जुन पाटोळे, सुरेंद्र जगताप, सदाशिव गुरव, रोहिणी बच्चे, वासंती काळे, दिलीप दानी, विलास गटने, आदि पदाधिकाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यास मोलाचा वाटा घेतला.
डॉ. वैभव अवताडे(रेटिना, मोतीबिंदू), डॉ. जयशील नाझरे(मोतीबिंदू, काचबिंदू, लहान मुलांचे स्पेशालिस्ट, रिफ्रॅक्टिव सर्जन), गणेश कांबळे(मार्केटिंग हेड), दुर्वाक्षी(ॲडमिन), शिवानी शिंदे(फ्लोअर मॅनेजर) यांनी शिबिरामध्ये खूप मोलाचे योगदान देऊन नागरिकांना सेवा दिली.


