रिक्षा-टॅक्सी चालकांचा मनपा मुख्यालयासमोर तीव्र एल्गार आंदोलन!



'भ्रष्ट डिव्हायडर' तात्काळ न हटवल्यास आमदार-खासदारांच्या घरावर मोर्चा; डॉ. बाबा कांबळें इशारा


पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) मोरवाडी चौकातील (अहिल्यादेवी पुतळ्यासमोर) 'अशास्त्रीय आणि भ्रष्टाचारग्रस्त काँक्रिट डिव्हायडर' विरोधात आज रिक्षा-टॅक्सी चालकांनी मनपा मुख्यालयासमोर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत कष्टकरी जनता आघाडी व ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या 'ठिय्या' आंदोलनात हजारो रिक्षाचालक, टॅक्सी ड्रायव्हर, दुचाकीस्वार आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेऊन प्रशासनाच्या मनमानी कारभाराला तीव्र विरोध दर्शवला.

 अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन  निवेदन स्वकारले 

सकाळी ११.३० वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात, आंदोलकांनी मनपा मुख्यालयाला घेराव घालत 'चुकीचे डिव्हायडर हटवा', 'भ्रष्टाचार बंद करा',

 'जनतेच्या जीवाशी खेळ बंद करा' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

डॉ. बाबा कांबळे यांनी मनपा आयुक्तांच्या नावे सात प्रमुख मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले. मनपाच्या संबंधित अधिकारी अभिमन्यू भोसले यांनी तातडीने आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले आणि डिव्हायडर त्वरित हटवण्याबाबत आश्वासन दिले.

उपस्थित प्रमुख पदाधिकारी:

 * पिंपरी-चिंचवड मनपा फेरीवाला समिती सदस्य सौ. आशा कांबळे

 * अल्पसंख्यक महासंघाचे अध्यक्ष रफीक कुरेशी

 * सामाजिक कार्यकर्ते राजा नायर

 * रिपब्लिकन सेनेच्या महिला अध्यक्ष गौरी शेलार,

कष्टगरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सर चिटनेस मधुराताई डांगे, कष्ट करें जनता गडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष मीनू  गिल, टपरी पातारी हातगाडी पंचायत, महाराष्ट्र उपाध्यक्ष दामोदर मांजरे महिला अध्यक्ष ज्योतीताई कांबळे सर्वजाताई कुचेकर, नानी गजरमल, पुणे जिल्हा उपाध्यक्ष इस्माईल मामूर शेख , शहर संघटक मलिक शेख, शहर सचिव शिवाजी कुडूक, दिग विभाग अध्यक्ष.. पाटील, आधी यावेळी उपस्थित होते.

  तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते.

 डॉ. बँक कांबळेंचा थेट आरोप: "हा डिव्हायडर म्हणजे भ्रष्टाचाराचार कुराण!"

प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. बाबा कांबळे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले:

 "कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास, वाहतूक तज्ज्ञांचा सल्ला किंवा जनसहभाग न घेता हा अपघातजन्य डिव्हायडर बसवला गेला आहे. हा केवळ 'सुशोभीकरण' नसून कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराच  आहे.

त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोंड ठेवत म्हटले की, "निवेदन देऊनही प्रशासन गप्प बसले आहे. हा प्रशासनाचा माज आहे! या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई झालीच पाहिजे."



आंदोलनातील प्रमुख आक्षेपांचे मुद्दे:

 * आर्थिक गैरव्यवहार: 'सुशोभीकरण'च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार.

 * तीव्र वाहतूक कोंडी: चुकीच्या रचनेमुळे सकाळी-सायंकाळी किलोमीटरभर वाहनांच्या रांगा.

 * वाढते अपघात: अरुंद जागा व चुकीच्या उंचीमुळे रिक्षा आणि दुचाकींचे अपघात वाढले.

 * पोलिसांना मागणी: डॉ. बाबा कांबळे यांनी पोलीस आयुक्तांना वाहतूक सुरक्षा व आर्थिक अनियमिततेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली.

 सात मागण्यांचा ठिय्या; भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षेची मागणी

आंदोलनात पुन्हा एकदा प्रशासनासमोर मांडण्यात आलेल्या सात प्रमुख मागण्या:

 * डिव्हायडर बसविण्याच्या प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा व्हावी.

 * मोरवाडी चौकातील अपघातजन्य डिव्हायडर तात्काळ हटवावा.

 * मनमानी निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय-कायदेशीर कारवाई करावी.

 * पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करावा.

 * डिव्हायडरच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी वाहतूक तज्ज्ञ समितीची नेमणूक करावी.

 * भविष्यातील प्रकल्पांत जनसहभाग कायद्याने बंधनकारक करावा.

 * रस्ते नियोजनासाठी तज्ज्ञ-अभियंता-नागरिक प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करावी.

डॉ. कांबळेंचा अंतिम इशारा:

प्रशासनाला जागे करण्यासाठी डॉ. बाबा कांबळे यांनी अत्यंत कठोर इशारा दिला आहे: "आजच्या आंदोलनाने प्रशासनाला जाग आली नाही, तर शहरातील सर्व गैरव्यवस्थापनाविरुद्धचा संघर्ष अधिक तीव्र करू. आम्ही आमदार-खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्यास कचरणार नाही. जनतेच्या सुरक्षेसाठी माघार नाही!"

डॉ. बाबा कांबळे यांनी जनतेच्या सुरक्षेचा हा गंभीर मुद्दा प्राधान्याने प्रकाशित करून भ्रष्ट प्रशासनाला जाब विचारण्यास मदत करावी, असे माध्यम प्रतिनिधींना नम्र विनंती  केले आहे.

थोडे नवीन जरा जुने