स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांचे अभिवादन

 


पिंपरी चिंचवड  : स्वराज्यरक्षक आणि शौर्यपरंपरेचे प्रतीक छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक येथील पावन समाधीला पिंपरी चिंचवड शहराचे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आज भेट देऊन अभिवादन केले.

या भेटीदरम्यान तुळापूर येथील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नवनाथ शिवले तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष शिवले यांनी समाधी परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरण व सर्वांगीण विकासकामांची सविस्तर माहिती दिली तसेच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून दिली.

सचिन चिखले म्हणाले, “ही कामे केवळ विकासकामे नसून इतिहासाची जागृति, परंपरेचा सन्मान आणि भावी पिढ्यांना छत्रपती संभाजीराजांच्या शौर्याची प्रेरणा देणारी स्मृतीस्थाने आहेत.” समाधान परिसरातील शांतता, दृश्यरम्यता आणि ऐतिहासिकतेशी प्रामाणिक राहणारी बांधणी हे सर्व समाधीच्या पावनतेला अधिक अधोरेखित करतात, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी उद्योजक रोहिदास शिवणेकर, विठ्ठल मांडेकर, उमेश शिंगाडे यांच्यासह इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.


सचिन चिखले, मनसे शहराध्यक्ष

थोडे नवीन जरा जुने