भोसरीत ‘‘UNITY MARCH’’ : विद्यार्थी-नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!


 


- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त उपक्रम 

- आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एकतेचा संदेश 

पिंपरी-चिंचवड - भारतीय जनता पार्टी भोसरी विधानसभा संघटनेतर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘‘UNITY MARCH’’ ला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या भव्य उपक्रमात विद्यार्थी, नागरिक, सामाजिक संस्था तसेच भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मार्चची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सरचिटणीस विकास डोळस, वैशाली खाड्ये, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संतोष लोंढे, युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, उपाध्यक्ष  रमेश वहिले, मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे, अमोल डोळस यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) उपक्रमाचे संचालक गणेश भामे, तसेच ‘माय भारत’ संस्थेचे समन्वयक आशिष शेटे यांच्या सहकार्याने परिसरातील विविध शाळा–महाविद्यालयांचे विद्यार्थी या मार्चमध्ये सहभागी झाले. विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनीही एकात्मतेचा संदेश देत मिरवणुकीत उत्साहाने सहभाग नोंदवला. 



मार्चदरम्यान ‘एक भारत… अखंड भारत…’ अशा घोषणा देत नागरिकांनी राष्ट्रीय एकतेचा संदेश दृढ केला. शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात झालेल्या या मिरवणुकीला स्थानिकांकडून मोठे कौतुक मिळाले. कार्यक्रमानंतर आयोजकांनी सर्व सहकारी, संस्था प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रतिक्रिया : 

 ‘एक भारत… अखंड भारत…’ या संकल्पनेतून भाजपा काम करीत आहे. सरदार पटेल यांनी दिलेल्या राष्ट्रीय एकतेच्या विचारांना दिशा मानून आम्ही शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात नागरिकांच्या सहभागातून उभी राहणारी ही एकजूट आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. 

- महेश लांडगे, आमदार,भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने