पिंपरी चिंचवड : माय अचिव्हर्स ट्रस्टच्या वतीने वाकड येथील अभिराज फाउंडेशनच्या विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा साहित्य वितरण करण्यातआले.
कार्यक्रमप्रसंगी माय अचियरवर्स ट्रस्टचे अध्यक्ष श्री लतेश शेरखाने, संस्थापक श्री, सचिन शेरखाने, स्पोर्ट फॉर युनिक ॲथलेट्स उपक्रम प्रमुख श्रीमती पूजा मेहरा टी टेक इंडिया फाऊंडेशनच्या प्रतिनिधी कृष्णा मॅडम, अभिराज फाऊंडेशनचे संचालक रमेश मुसुडगे, मुख्याध्यापिका अनिता चव्हाण, महात्मा गांधी सेवा संघ संचलित पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक यशवंत सोळंके, भाग्यश्री मोरे, समुपदेशक हरिदास शिंदे तसेच अभिराज फाऊंडेशनचे कर्मचारी आणि विशेष विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कृष्णा मॅडम म्हणाल्या "हा उपक्रम विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम जागवणे, आत्मविश्वास वाढवणे आणि दिव्यांगांसाठी आयोजित विविध क्रीडास्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे या प्रमुख उद्देशाने राबविण्यात येत आहे."
![]() |
अभिराज फाऊंडेशनचे संचालक रमेश मुसुडगे म्हणाले "आजपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांनी शहर, जिल्हा तसेच राज्य स्तरावर दिव्यांगासाठी आयोजित अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यशस्वी वाटचाल केलेली आहेच पण आज मिळालेल्या क्रीडा साहित्यामुळे आगामी काळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित स्पर्धेत कामगिरी करायला प्रोत्साहन मिळेल याची खात्री वाटते.
माय अचिव्हर्स ट्रस्टचा हा उपक्रम “सर्वांसाठी क्रीडा” या संकल्पनेला बळ देणारा असून या उपक्रमांतर्गत आजपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर,पुणे, व सोलापूर जिल्हा व उपनगरातील ३५ बौद्धिक दिव्यांगांसाठी कार्यरत विशेष शाळांना क्रीडा साहित्य वितरित करण्यात आले आहे यापुढेही अशा अनेक गरजू शाळांसाठी हा उपक्रम राबवण्याचा मानस आहे.सर्वांनी मिळून विशेष दिव्यांग खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा श्री. सचिन शेरखाने यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश मुसुडगे यांनी केले.सूत्रसंचालन स्मिता हांडे पवार यांनी तर अनिता चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

