रविवारी पिंपरी येथे माळी समाजाचा राज्यव्यापी वधू, वर परिचय मेळावा

 



पिंपरी चिंचवड : खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने रविवारी पिंपरी येथे अखिल माळी समाजाच्या २७ व्या राज्यव्यापी भव्य वधु - वर, पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नकुल महाजन यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

   पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे रविवारी (दि. ९ नोव्हेंबर) रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे आमदार महेश दादा लांडगे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार असून अध्यक्ष धुळे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गुलाबराव माळी आणि प्रमुख पाहुणे माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, अखिल भारतीय माळी महासंघ धुळे जिल्हाध्यक्ष आर. के. माळी, मंडळाचे संस्थापक एस.के.माळी,ज्येष्ठ सल्लागार पी. के. महाजन, नाना भाऊ माळी, भीमराव माळी, उद्धव महाजन, किशोर वाघ, शिवाजी माळी आदी उपस्थित राहणार आहेत.



    सचिव नवल खैरनार, खजिनदार रवींद्र माळी, वधु वर समिती अध्यक्ष उदयभान पाटील, उपाध्यक्ष गणेश चौधरी, योगेश माळी, मंडळाचे उपाध्यक्ष रमेश सोनवणे, ॲड. गोविंद माळी, प्रशांत महाजन, रमेश बिरारी, संघटक दिपक बागुल, श्रीमती रजनी वाघ, सहसचिव अनिल सोनवणे,हिशोबणीस डी‌.के.माळी, ज्ञानेश्वर वाघ,व मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांनी व सभासदांनी आदींनी मेळाव्याच्या आयोजनात सहभाग घेतला आहे. 


थोडे नवीन जरा जुने