राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया १४ नोव्हेंबरपासून सुरू...

 


पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सुरू राहणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी वरील कालावधीत दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पक्ष कार्यालय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे संपूर्ण माहितीसह आपले अर्ज सादर करावेत.

अर्जासोबत खालील कागदपत्रे व माहिती सादर करणे आवश्यक आहे:

उमेदवाराचे पूर्ण नाव

विधानसभेचे नाव

प्रभागाचे नाव व क्रमांक

मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक

आरक्षण प्रवर्ग (ओपन, ओबीसी, एस.सी., एस.टी.)

जात वैधता प्रमाणपत्र (छायांकित प्रत)

जन्मतारीख, वय, शिक्षण

आधार कार्ड छायांकित प्रत

पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्व क्रमांक

उमेदवाराचा कार्य अहवाल

सदर माहिती आपले दैनिक, वेब पोर्टल तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिद्ध करण्यात यावी, ही नम्र विनंती.

कळावे,

आपला स्नेहांकित,

योगेश मंगलसेन बहल

शहराध्यक्ष व मा.महापौर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,

पिंपरी चिंचवड शहर


थोडे नवीन जरा जुने