तमाम मातंग समाजाच्या मागणीला यश



आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे  पुतळा स्मारक चिंचवड स्टेशन हे आता गूगोलच्या नकाशावर दिसणार...

पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप्त विकास आराखडा तयार करित असताना आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक चिंचवड स्टेशन हे वगळण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाज बांधवानी प्रारुप्त विकास आराखड्यात स्मारकाचे नाव समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली होती.

या मागणीची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या माध्यमातून गूगोलच्या नकाशावर देखील आद्यक्रांतीगुरू लहूजी साळवे यांचे नाव दिसत असल्याने मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी यांनी फटाके फोडून, स्मारकास पुष्पहार अर्पण करून हालकी वाजवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व अध्यक्ष गणेश कलवले, राष्ट्रीय काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, मातंग चेतना परिषदेचे जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, प्रदेशाध्यक्ष कृष्णा दादा साबळे,प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, शंकर खवळे, सागर यादव, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने