१२०० किलो गांजा, ६ कोटींची किंमत… छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई, तीन तस्कर अटकेत


छत्तीसगड : बलरामपूर पोलिसांनी अमली पदार्थांच्या मोठ्या नेटवर्कवर जोरदार कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश सीमेच्या जवळ एका ट्रकमधून १२०० किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे ६ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. नारळाच्या सोल्यांमध्ये लपवून ही खेप वाहतूक केली जात होती. या प्रकरणी तीन तस्करांना अटक करण्यात आली आहे.

छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यात पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ६ कोटी रुपये किमतीचा १२०० किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात ट्रकमध्ये प्रवास करणाऱ्या तीन आरोपींना घटनास्थळीच अटक करण्यात आली. ही खेप ओडिशामधून राजस्थानकडे नेली जात होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही कारवाई ठोस माहितीच्या आधारे करण्यात आली. रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री बलरामपूर जिल्ह्यात उत्तर प्रदेश सीमेवर असलेल्या धनवार परिसरात तपासणी दरम्यान एका संशयित ट्रकला थांबवण्यात आले. तपासणी करताना ट्रकमध्ये नारळाच्या सोल्यांमध्ये लपवलेले गांजाचे पोते आढळून आले.

बलरामपूरचे पोलीस अधीक्षक वैभव बँकर यांनी सांगितले की, ट्रकमधून एकूण ४० पोती गांजा जप्त करण्यात आला असून त्याचे एकूण वजन १,१९८.४६० किलो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार याची अंदाजे किंमत सुमारे ६ कोटी रुपये आहे. तपासात हा प्रतिबंधित अमली पदार्थ ओडिशामधून लोड करण्यात आल्याचे समोर आले आहे.

थोडे नवीन जरा जुने