पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. पौर्णिमा त्रिवेदी कुलकर्णी, रिशु अगरवाल, बाल कलाकार भार्गव जगताप, विद्यार्थी, शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण, भूगोल, विकसित भारत, आनंददायी महासागर कथा, देशभक्ती अशा माहितीपूर्ण विषयांवर सादरीकरण केले.
तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात भक्तीगीते, टॉरिन्स म्युझिक बँड, नृत्य आणि नाटक सादर केले. शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी केले.
उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, व्यवस्थापक मनीष ढेकळे, शिक्षक व पालक उपस्थित होते. समारोप वेळी 'वंदे मातरम' सादर करण्यात आले.
प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.
