अ क्षेत्रीय कार्यालयातून सर्वाधिक ३५६ तर ग क्षेत्रीय कार्यालयातून १८९ नामनिर्देशन अर्जांचे वितरण
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने आज दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्जांचे वितरण सुरू झाले आहे. त्यानुसार सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून एकूण २ हजार २१२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आज अ, ब, क, ड, इ, फ, ग व ह या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण २ हजार २१२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
आज दुपारी ३ वाजेपर्यंत प्रभागनिहाय वितरित करण्यात आलेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या –
अ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १०, १४, १५, १९ साठी अनुक्रमे ६८, ७८, ६७ व १४३ असे एकूण ३५६ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ब क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १६, १७, १८, २२ साठी अनुक्रमे ७९, ९६, ४८ व ७७ असे एकूण ३०० नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
क क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २, ६, ८, ९ साठी अनुक्रमे ६५, २३, ८४ व १४३ असे एकूण ३१५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ड क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २५, २६, २८, २९ साठी अनुक्रमे ८५, ९०, ३४ व ८३ असे एकूण २९२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
इ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. ३, ४, ५, ७ साठी अनुक्रमे ६९, ४८, ५५ व ३८ असे एकूण २१० नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
फ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १, ११, १२, १३ साठी अनुक्रमे ३५, ८५, २३ व ९१ असे एकूण २३४ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ग क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २१, २३, २४, २७ साठी अनुक्रमे ४२, ४५, ४३ व ५९ असे एकूण १८९ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ह क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. ३२, ३१, ३०, २० साठी अनुक्रमे ५१, ८३, ११७ व ६५ असे एकूण ३१६ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
