BSNL : सरकारी कंपनी BSNL विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफर अंतर्गत 251 रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100GB डेटा दिला जात आहे.
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL तिच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी प्रसिद्ध आहे. प्रायव्हेट कंपन्यांच्या तुलनेत BSNL कमी किमतीत जास्त डेटा आणि कॉलिंगचे फायदे देते. सध्या कंपनीचा एक शानदार प्लॅन उपलब्ध आहे, ज्यात BSNL कमी पैशांत अनलिमिटेड कॉलिंग आणि 100GB डेटा देत आहे. हा प्लॅन विशेषत: विद्यार्थ्यांसाठी आहे. एकदा हा रिचार्ज केल्यावर वापरकर्त्यांना 28 दिवसांपर्यंत डेटाची चिंता करावी लागणार नाही.
251 रुपयांचा ‘लर्नर प्लॅन’
BSNL ने सोशल मीडियावर पोस्टद्वारे या प्लॅनची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा हा प्लॅन 251 रुपयांचा आहे. यात कंपनी 100GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS देत आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. ही विशेष ऑफर 13 डिसेंबरपर्यंतच वैध आहे. जर तुम्हाला या प्लॅनचा फायदा घ्यायचा असेल तर 13 डिसेंबरपूर्वी रिचार्ज करणे आवश्यक आहे.
याच्या तुलनेत जिओचा प्लॅन महाग
BSNL च्या या प्लॅनच्या तुलनेत जिओचा 28 दिवस वैधतेचा प्लॅन अधिक महाग आहे. जिओ 349 रुपयांत 28 दिवसांचा प्लॅन देते, ज्यात एकूण 56GB डेटा, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याशिवाय या प्लॅनमध्ये 18 महिन्यांसाठी Google Gemini चा प्रो प्लॅन आणि JioHotstar चे सब्स्क्रिप्शनही समाविष्ट आहे.
लवकरच रिचार्ज प्लॅन महाग होऊ शकतात
रिपोर्टनुसार, या महिन्यात जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि BSNL यांसह सर्व कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनचे दर वाढवू शकतात. गेल्या काही महिन्यांपासून टेलिकॉम कंपन्यांचे उत्पन्न कमी होत असून ते वाढवण्यासाठी वापरकर्त्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडू शकतो. अंदाज आहे की एकूण टॅरिफमध्ये सुमारे 15% वाढ पाहायला मिळू शकते.
