श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, शिवतेजनगर, चिंचवड आयोजित दिव्यांग (अपंग) सेवा केंद्रांचे उद्घाटन.

 


 पिंपरी चिंचवड - जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दिनांक ०३/१२/२०२५ ला सायंकाळी ५.०० वाजता दिव्यांग सेवा केंद्रांचे उद्घाटन मा. श्री नारायण बहिरवाडे,प्रा. हरिनारायण शेळके, राजेंद्र वाघचौरे (उपाध्यक्ष प्रहार संघटना) यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.

    याप्रसंगी श्री दत्तात्रय भोसले (अध्यक्ष प्रहार संघटना) संगीता जोशी (महिला प्रतिनिधी) श्री ज्ञानदेव नारखेडे (अध्यक्ष दिव्यांग सेवा केंद्र) यांची प्रमुख उपस्थिती होती.

    सर्व प्रथम प्रा. हरिनारायण शेळके यांनी प्रास्ताविक करून अपंग कोणास म्हणावे,याच दिवशी (०३ डिसेंबरला) "अपंग दिन " साजरा का करण्यात येतो या विषयाची सविस्तर माहिती दिली.

   प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री नारायण बहिरवाडे यांनी समाजाच्या प्रगतीत अपंगांचाही वाटा असावा यासाठी शासनासह समाजाकडून ही प्रयत्न व्हायला हवेत.या गोष्टी साधावयाच्या तर गरज आहे ती अपंग व्यक्ती बाबतच्या संवेदनशीलतेची. आमच्या सेवा केंद्रात ज्या अपंगांना जी काही मदत लागेल ती सर्व प्रतिष्ठानच्या वतीने पुरविली जाईल असे आश्वासन दिले.

   त्यानंतर श्री दत्तात्रय भोसले, श्री राजेन्द्र वाघचौरे श्री ज्ञानदेव नारखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

    या कार्यक्रमाकरिता या पंचक्रोशीतील अनेक दिव्यांग हजर होते.या पवित्र ठिकाणी सेवा केंद्र स्थापन झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजू गुणवंत, क्षमा काळे, श्री दिनकर पंडीत, श्री यशवंत भोळे,सौ.शोभा नलगे, सौ.रंजना राणे, श्री रमेश राणे ह्यांनी परिश्रम घेतले.

थोडे नवीन जरा जुने